Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
क्राईमशिर्डी

शिर्डी येथील तिघांवर जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल होण्यासाठी  आरणे यांचा अर्ज दाखल

शिर्डी प्रतिनिधी  

sai nirman
जाहिरात

शिर्डी येथे काही दिवसापूर्वी प्रसादाचे जास्त भाव लावले होते त्यावरून शिर्डीचे राजकारण तापले होते दोन्ही गटांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार अर्ज दाखल केले होते ह्या दुकानदाराने प्रसादाचे दर जास्त लावले होते त्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याने आज शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष विमने यांना त्यावर झालेल्या अत्याचार बाबत गुन्हा दाखल व्हावाअशी  लेखी तक्रार दिली आहे त्यात त्याने म्हटले आहे कि 

DN SPORTS

kamlakar


वरील विषयास अनुसरुन कारणे फिर्याद देतो की, मी शिर्डी येथील कानिफनाथ महाराज चौक सेवाधाम इमारत, डॉ. गुजराथी दवाखाना शेजारी प्रसाद विक्रीचे दुकान चालवितो व त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. दिनांक १४.०३.२०२५ रोजी मी नित्यनियमाने भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेल्या शिर्डी येथील वर नमूद दुकानात प्रसाद विक्रीचे काम करीत असतांना तेथे एक साईभक्त आला •व त्याने माझ्या दुकानातून दुपारी १ ते १.३० चे दरम्यान काही पुजेचे व प्रसादाचे सामान खरेदी केले.

या सर्व वस्तुंचे बील हे रक्कम रुपये ७२०/-झालेले होते. साईभक्त इसमाने त्याचे जवळ असलेले सामान हे माझ्या दुकानात ठेवुन तो साईबाबा मंदीरात दर्शनासाठी निघून गेला. दर्शन झाल्यावर साईभक्त इसम हा माझ्या दुकानात आला व त्याने त्याचेजवळील गरजेचे सामान घेऊन तो तेथुन घेवुन निघून गेला.

परंतु काही वेळानंतर तेथे ५० ते ६० गांवकरी व साईभक्त इसम हे माझ्याकडे माझ्या दुकानावर आले व वर नमूद तिघे इसम हे मला म्हणाले की, तु एवढ महाग पुजेचे व प्रसादाचे सामान का विकतो?

त्यावर मी त्याला म्हणालो की, मला कमी भावात सामान विक्री करण्यास परवडत नाही, महागाई वाढली आहे, मला दुकानाचे भाडे देखील द्यावे लागते असे समजावून सांगितले. त्यावर हे मला म्हणाला की, तुझे नांव उमेश चंद्रभान आरणे हेच आहे ना, तु मांगाचा आहे ना, तुला जास्त झाले आहे काय, तुझा बेतच पाहतो असे म्हणाला. त्यानंतर मी त्यांना म्हणालो की, तुम्ही विनाकारण माझ्यावर खोटेनाटे आरोप करु नका,

मी बऱ्याच दिवसांपासून येथे धंदा करीत आहे, आत्तापर्यंत माझ्यावर कोणीही असे खोटे आरोप लावलेले नाहीत, उगाचच मला बदनाम करु नका असे समजावून सांगितले. वर नमूद तीनही इसमांना मी त्यांना समजावून सांगितल्याचा राग आला व त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली व म्हणाले की, तु मांगट्या खुप माजला आहेस, तु मांगट्या आम्हांस काय करायचे ते शिकवणार का?

असे म्हणाल्यानंतर मी त्यांना समजावून सांगितले की, कृपया तुम्ही जातीवाचक शिवीगाळ करु नका, खोटेनाटे बोलून माझी बदनामी करु नका असे सांगितले. मात्र तरीही वर नमूद इसम हे काहीएक ऐकून घेण्याचे मनस्थितीत नव्हते. माझे त्यांना समजावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले व
त्यांनी चिडून मला धक्काबुक्की करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करणास सुरुवात केली व तु खुप माजला आहेस,

तुझा आता काटाच काढतो असे वर नमूद इसम मला म्हणाले. त्यावेळी आरडाओरडा निर्माण झाल्याने तेथे शिर्डी पोलीस स्टेशनचे  पोलीस आले व त्यांनी कोणतीही चौकशी न करता मलाच झालेल्या प्रकाराबाबत जबाबदार धरुन मला बळजबरीने ताब्यात घेतले व माइयाविरुध्द शिर्डी पोलीस स्टेशनला खोट्या स्वरुपाचा फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. वास्तविक पाहता मी कधीही व कोणासही फसविलेले नाही व तसे कोणतेही गुन्हे माझ्यावर दाखल नाहीत.

वर नमूद इसम हे आडदांड व नंगट स्वरुपाचे असून ते कायद्याला जुमाननारे नाहीत. त्यांनी केलेल्या कृत्याबाबत त्यांचेविरुध्द मला जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत व मला बेदम स्वरुपाची मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल होणे जरुरीचे आहे.
तरी याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येवुन वर नमूद इसमांना त्यांचे कृत्याबाबत कडक शासन होवुन त्यांचेवर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात यावा व मला न्याय मिळावा. अशी  विनंती उमेश चंद्रभान आरणे केली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button