Letest News
“साईंच्या नावावर ऑनलाईन दरोडा! बनावट वेबसाईटने भाविकांची फसवणूक” “साईचरणी ९२ लाखांचा सुवर्ण मुकुट… भक्तीसमोर सोन्यालाही तेज!” “वरून सर्व सेटिंग झाली का?” — शिर्डीतून अंजली दमानियांचा सरकारला थेट सवाल साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे अर्पण भाविकांना तीन दिवस आमरसाची मेजवानी २.१० लाखांची सोन्याची बांगडी सापडली-महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखवली प्रामाणिकता शिर्डीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस-संस्थान कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला-हरिभाऊ कोते यांचा इशारा ठरला खरा? शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली
Blog

वेळ वाढवून देत असल्याचं सांगत सुरू असलेलं हे आंदोलन मागे घेण्याचा मनोज जरांगे यांचा निर्णय!त्यानंतर शिर्डीतील तुषार विलासराव गोंदकर यांचेही आमरण उपोषण मागे!

मराठा आरक्षण व संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शिर्डीमध्ये माजी नगरसेवक तुषार राजे विलासराव गोंदकर पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते आज उपोषणाचा चौथा दिवस होता. मात्र आज शासनाच्या शिष्टमंडळाने थेट जालन्यातील अंतरवली सराटी येथे जाऊन उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात कायदेशीर बाबी व सर्व समजून सांगितल्यानंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित करत आहोत

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असे सांगितल्यानंतर शिर्डीतील तुषार विलासराव गोंदकर यांनीही चार दिवसापासून सुरू असलेले आपले आमरण उपोषण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन स्थगित केले आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण त्यानंतरही मिळाले नाही तर परत आपण आमरण उपोषण करू. व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सर्व कार्यकर्त्यांसह शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहून त्यांना साथ देऊ, असे आश्वासन यावेळी तुषार विलासराव गोंदकर यांनी दिले. यावेळी त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं होतं. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिलं.

kamlakar

त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला वेळ वाढवून देतो असं त्यांनी जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यासाठी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू असं आश्वासन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं. त्यामुळे मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन मागे घेतल्यानंतर शिर्डीतील तुषार विलासराव गोंदकर यांचेही आमरण उपोषण आज मागे घेण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button