Letest News
जालिंदर बोरुडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी तपासाला वेग "साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी झटणारे सुरक्षा अधिकारी माळी सेवाभावातून जिंकली भाविकांची मने" मतदार यादी पुनर्विलोकन मोहिमेत शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा : अविनाश सनस कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संयम संपत चालला-न्यायासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकेत अहिल्यानगर-कोपरगाव-राहता येथे अतिक्रमणांवर कारवाई-मग शिर्डीत वेगळा न्याय का? लिंगनिदान रॅकेटचा आणखी एक सूत्रधार जेरबंद-५ सोनोग्राफी मशीन-१९ आरोपी आणि ६ डॉक्टर गजाआड समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त
क्राईमशिर्डी

साईनगरीत बालशोषणाचा काळा धंदा उद्ध्वस्त! देवाच्या दरबारात मुलांची भीक मागवणाऱ्यांवर पोलिसांचा बेड्या ठोकणारा घाव


शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या पवित्र नगरीत बालकांना ढाल बनवून चालवला जाणारा भिक्षेचा व विक्रीचा काळा धंदा अखेर उघडकीस आला असून शिर्डी पोलिसांनी या नराधम प्रवृत्तीला जबरदस्त चाप लावला आहे. मंदिर परिसरात शिक्षणाऐवजी रस्त्यावर राबवलेल्या १४ निष्पाप बालकांची सुटका करत पालकांच्या अमानुषतेचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
🩸 देवाच्या नावाखाली बालकांचा छळ
फुलहार, प्रसाद, फोटो विक्री आणि गंध लावण्याच्या आडून पालकांनी स्वतःच्या पोटासाठी आपल्या लेकरांना उघड्यावर ढकलले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ही मुले शाळेच्या दारात नव्हे तर देवाच्या दारात भीक मागताना सापडली. बालकांच्या शरीरावर कष्टाचे ओझे आणि मनावर भीतीचे सावट टाकणाऱ्या या पालकांवर आता कायद्याचा वज्राघात झाला आहे.


⚖️ पोलिसांचा थेट वज्राघात
मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार राबवलेल्या विशेष मोहिमेत शिर्डी पोलिसांनी बाल न्याय अधिनियम २०१५ (सुधारित २०२१) कलम ७५ व ७६ अंतर्गत गुन्हा रजिस्टर नं. ८९/२०२६ नोंदवून संबंधित पालकांवर थेट गुन्हे दाखल केले आहेत.


🏠 बालकांना संरक्षण, गुन्हेगारांना कारागृहाची वाट
सुटका करण्यात आलेल्या १० मुले व ४ मुली यांना बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये श्रीरामपूर, संगमनेर व राहुरी येथील बाल निरीक्षण गृहात हलविण्यात आले असून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


👮‍♂️ ‘झिरो टॉलरन्स’ कारवाई
ही धडक कारवाई अमोल भारती (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी) व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखाली, महिला व बाल विकास विभाग, चाइल्डलाईन, आर.सी.पी. पथक, साई संस्थान व नगरपरिषद यांच्या संयुक्त सहभागातून पार पडली.


⚠️ थेट इशारा – आता सुटका नाही!
“मुलांना भीक मागवणारे, विक्रीस लावणारे कोणीही सुटणार नाही. देवाच्या दरबारात बालशोषण खपवून घेतले जाणार नाही. नियम मोडाल तर थेट गुन्हा दाखल!”
— शिर्डी पोलीस

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button