Letest News
दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव!
क्राईमशिर्डी

दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका!

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर शिर्डी पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले, तर पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. या कारवाईत धारदार चाकू, नशेचे इंजेक्शन, सहा रिकाम्या सिरिंज आणि मोटारसायकल असा सुमारे ५० हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठा गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी टोळीचा डाव उधळून लावला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कालिकानगर ते बन रोड परिसरातील राजगुरुनगर भागात काही सराईत गुन्हेगार मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती शिर्डी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाला मिळाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता संबंधित परिसरात धाव घेत सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच टोळीतील सौरव किरण गायकवाड व मुसा (पूर्ण नाव उपलब्ध नाही) हे दोघे पसार झाले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून सावड्या उर्फ साईनाथ गोरक्षनाथ पाचारणे (रा. राजगुरुनगर, शिर्डी), कुणाल प्रकाश मुदलीयार (रा. पानमळा, शिर्डी) आणि प्रथमेश बबन घोरपडे (रा. पानमळा, शिर्डी) यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २१ सेंटीमीटर लांबीचा धारदार चाकू, ३० मिली क्षमतेची नशेच्या इंजेक्शनची बाटली, सहा रिकाम्या सिरिंज तसेच काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४), ३१०(५) व ३(५) प्रमाणे दरोड्याची पूर्वतयारी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सराईत गुन्हेगारांचा पूर्वइतिहास तपासणार
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या टोळीचा शिर्डीतील इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, तसेच पसार झालेल्या दोघांचा शोध कुठे लागतो, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोऱ्हाडे करीत आहेत.



मोठा गुन्हा घडण्याआधीच पोलिसांचा ‘ब्रेक’
रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने संभाव्य दरोडा टळला. धारदार चाकू आणि नशेचे साहित्य सापडल्याने या टोळीचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

नशेचे इंजेक्शन येतात कुठून? ‘साईदर्शन’चा सवाल!
सराईत गुन्हेगारांकडे नशेचे इंजेक्शन आणि सहा सिरिंज सापडणे गंभीर; पुरवठ्याच्या मुळापर्यंत पोहोचून कठोर कारवाईची गरज
शिर्डी पोलिसांच्या कारवाईत दरोड्याच्या तयारीतील संशयितांकडून नशेचे इंजेक्शन, सहा रिकाम्या सिरिंज आणि धारदार चाकू जप्त झाल्याने या नशेच्या इंजेक्शनचा पुरवठा नेमका कुठून होतो? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे इंजेक्शन कोणत्या मेडिकल स्टोअरमधून, वितरकाकडून किंवा अन्य माध्यमातून संशयितांच्या हातात पोहोचले, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. संबंधित औषधाचा नेमका प्रकार, त्याची कायदेशीर विक्री प्रक्रिया, खरेदी-विक्रीची नोंद, बिल, स्टॉक रजिस्टर आणि पुरवठा साखळी यांची तपासणी करण्यात यावी.


केवळ इंजेक्शन बाळगणाऱ्यांवर कारवाई करून हा विषय थांबता कामा नये; या पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. संबंधित मेडिकल दुकाने व वितरकांची तपासणी करून नियमबाह्य विक्री आढळल्यास पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे कठोर कायदेशीर कारवाई करावी.
‘पुरवठादार कोण?’ याचा शोध लागणार का?
शिर्डीसारख्या धार्मिक पर्यटनस्थळी अशा प्रकारचे नशेचे साहित्य गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींपर्यंत पोहोचत असेल, तर हा केवळ पोलिसांचा नव्हे तर सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर विषय आहे. त्यामुळे या प्रकरणात इंजेक्शनचा स्त्रोत शोधून संपूर्ण पुरवठा साखळी उघडकीस आणण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र FDAच्या अधिकृत माहितीनुसार औषध विभाग परवाना नसलेल्या विक्री संस्था तसेच बेकायदा औषध व्यापाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास जबाबदार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button