Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
Blog

काम करण्यास गेल्यानंतर घराचे कुलूप तोडून चोरी!सोन्याची दागिने व रोख रक्कम असा एक लाख 26 हजारचा ऐवज लंपास!

शिर्डी (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील कनकुरी येथे घराला कुलूप लावून शेतात काम करण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उघडून घरातील सुमारे एक लाख 26 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील कणकुरी येथील जालिंदर तुळशीराम शिंदे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, आपण कुटुंबासह कनकुरी येथे राहतो. एक डिसेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता आम्ही जेवण करून नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेलो. मुलगा हर्षद हा कोपरगाव येथे कॉलेजला गेला. आम्ही जाताना घराचे हॉलचे रूमला मधून कडी लावली व किचनच्या रूमला कुलूप लावून शेतात कामाला गेलो होतो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

दुपारी दोन वाजता शेतातून घरी आल्यानंतर घराचे दार उघडे होते. व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. बेडरूम मधील कपाट सुद्धा उघडे दिसले. कपाटातील सामान इकडे तिकडे पडलेले होते. कपाटातील लाकर मध्ये ठेवलेले पैसे सोन्याचे दागिने दिसून आले नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझ्या संमतीशिवाय , स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घराचे कुलूप तोडून 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गळ्यातील झुबे ,70 हजार रुपये किंमतीचे सोन्याची गळ्यातील पोत व 31 हजार रुपये रोख असे एकूण एक लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अशा आशयाची फिर्याद त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली असून शिर्डी पोलीस ठाण्यात त्यानुसार गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 10 68 नुसार भादवि कलम 380/ 454 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button