Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
राजकीयशिर्डी

श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने सभासदांना डिव्हीडंट व दिवाळी भेट वस्तूंचा विविध मान्यवरांच्या हस्ते वितरण प्रारंभ!

शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने सभासदांना यावर्षी दिवाळीनिमित्त 15 टक्के डिव्हीडंट आणि ठेवीवर नऊ टक्के व्याज तसेच प्रत्येक सभासदाला दिवाळी भेट म्हणून 50 किलो साखर, भिंतीवरील घड्याळ, पाच लिटर तेलाचा डब्बा ,एक किलो फरसाण व एक किलो मिठाई देण्यात येत असून या दिवाळी भेट वस्तूंचा वितरण प्रारंभ नुकताच शिर्डी येथे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर तसेच सरला बेट चे महंत रामगिरीजी महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे महंत श्री काशीकानंद महाराज यांच्या हस्ते नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या दिवाळी भेटवस्तू वितरण प्रारंभ कार्यक्रमाला साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, श्रीमती प्रज्ञा मंहाडुळे, विश्वनाथ बजाज, मुख्यालेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे ,संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक रोहिदास माळी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


यावेळी या संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी संस्थेत गेल्या सहा महिन्यापासून विविध सभासदांच्या हिताचे व पारदर्शी असे निर्णय घेण्यात आले असून संस्थेची प्रगती अधिकाधिक कशी होईल, संस्थेपासून येथे येणाऱ्या भाविकांना अधिक सुविधा ,लाभ कसा देता येईल ,याचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सातत्याने प्रयत्न असून त्यास सर्वांचे सहकार्य मिळत आहे. असे आपल्या प्रस्तविकात सांगितले. यावेळी मंहत रामगिरीजी महाराज

व महंत काशीकानंद महाराज यांनीही या संस्थेला तसेच संस्थेच्या सभासदांना असीच यापुढे प्रगती होत राहून प्रत्येकाच्या जीवनात दिवाळीप्रमाणेच प्रत्येक दिवस गोड जावो. असे यावेळी आशीर्वाद दिले. संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनीही या संस्थेद्वारे सभासदांचे हित चांगल्या प्रकारे जपले जात असल्याचे सांगून एक प्रकारे या नवीन संचालक मंडळाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन पोपटराव कोते,

तसेच संस्थेचे संचालक महादू कांदळकर, संभाजी तुरकणे ,मिलिंद दुनबळे भाऊसाहेब लवंडे , सुनंदा जगताप, कृष्णा आरणे ,देविदास जगताप, तुळशीराम पवार, इकबाल तांबोळी ,सौ लता बारसे, भाऊसाहेब कोकाटे ,विनोद गोवर्धन कोते, गणेश अहिरे, संभाजी गागरे व तज्ञ संचालक भाऊसाहेब लबडे ,सचिव नबाजी नामदेव डांगे ,सहसचिव विलास वाणी व संस्थेचे सर्व कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button