Letest News
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर
क्राईमशिर्डी

नगर–मनमाड रोडवर भरधाव वाहनाचा कहर-अज्ञात भिकाऱ्याचा चिरडून मृत्यू-अपघातानंतर वाहन चालक फरार

नगर–मनमाड रोडलगत हॉटेल कृष्णा परिसरात काल रात्री थंडीपासून बचावासाठी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अज्ञात भिकाऱ्याला भरधाव वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात संबंधित भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


गोणीमध्ये झोपलेल्या भिकाऱ्यावर वाहन घुसले
मृत भिकारी हा रात्रीच्या थंडीत स्वतःकडे असलेल्या बाटल्या गोळा करण्याच्या गोणीमध्ये अंग घालून रस्त्याच्या कडेला झोपलेला होता. याच दरम्यान अज्ञात वाहनचालकाने वेगावर ताबा न ठेवता थेट त्याच्या अंगावर वाहन घातले. या अपघातात भिकारी पूर्णपणे चिरडला गेला.

kamlakar


अपघातानंतर वाहन चालक फरार
अपघात घडवून आणल्यानंतर संबंधित वाहनचालक मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला. कोणत्या वाहनाने हा अपघात घडवला, वाहन क्रमांक किंवा चालकाची ओळख अद्याप अज्ञात आहे.


पोलीस घटनास्थळी; पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमला
घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृत भिकारी कोण होता, तो कुठून आला होता याबाबत आजपर्यंत कोणतीही ओळख पटलेली नाही.


निष्काळजी वाहनचालकांवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे पुन्हा एकदा भरधाव व निष्काळजी वाहनचालकांमुळे निष्पापांचे बळी जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या आधारे आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button