Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
क्राईमशिर्डी

शिर्डीत ‘मुंबई बिर्याणी’चा घाणेरडा खेळ उघड! बिर्याणीत गुटख्याची पुडी – खवय्यांच्या आरोग्याशी खिलवाड

शिर्डीतील नवीन पिपळवाडी रोड परिसरात असलेल्या मुंबई बिर्याणी दुकानात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने पार्सल आणलेल्या बिर्याणीत चक्क गुटख्याची पुडी आढळल्याने खळबळ उडाली. हा प्रकार पाहून ग्राहक हादरला असून हॉटेल मालकाला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढल्याचा आरोप आहे.
🤢 स्वयंपाकघरात घाणीचं साम्राज्य – झुरळं, आळ्या आणि दुर्गंधी!
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी हॉटेलच्या किचनची पाहणी केली असता अंगावर काटा आणणारे दृश्य समोर आले. बिर्याणीच्या भांड्यात तारेच्या घासणीचे तुकडे, कचऱ्याजवळ ठेवलेलं चिकन, फुटलेल्या फरशीत साचलेलं पाणी आणि त्यात आळ्या, सर्वत्र झुरळांची वर्दळ – अशा अस्वच्छतेत अन्न तयार होत असल्याचं उघड झालं.
⚠️ बिनापरवाना धंदा? अन्न सुरक्षा नियमांची उघडपणे पायमल्ली
संबंधित दुकान बिनापरवाना चालत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याची मागणी जोर धरतेय. “अशा ठिकाणी लोकांच्या जीवाशी खेळ चाललाय” असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
😡 “मुख्याधिकारी झोपलेत का?” – हॉटेल सील करण्याची जोरदार मागणी
या प्रकरणानंतर शिर्डी नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “अंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत असून, तात्काळ कारवाई करून हे हॉटेल सील करावे, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
🛑 मोठा सवाल – मुख्याधिकारी कारवाई करतील का?
शिर्डीकरांचा आता थेट प्रश्न – “या जीवघेण्या प्रकारावर मुख्याधिकारी ठोस कारवाई करून हॉटेल सील करणार का, की पुन्हा दुर्लक्षच?”
👉 प्रशासनाच्या पुढील पावलाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे!अन्न भेसळ तपासणी खाते फक्त खाण्यासाठीच आहे का?”
शिर्डीत उघड झालेल्या घाणेरड्या प्रकारानंतर सर्वसामान्य नागरिकांचा संतप्त सवाल समोर येतोय—अन्न भेसळ रोखण्यासाठी असलेलं प्रशासन नेमकं काम करतंय की फक्त नावालाच आहे? नियमांचे उल्लंघन, अस्वच्छता आणि थेट आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेलांवर कारवाई का होत नाही?
👉 नियम आहेत, पण अंमलबजावणी कुठे?
👉 तक्रारी होतात, पण कारवाई का दिसत नाही?
👉 अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली जाणार का?
⚠️ नागरिकांची स्पष्ट मागणी – “अन्न भेसळ करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा हे प्रकार वाढतच राहतील!”

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button