Letest News
जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स... "साईनगरीत वाढत्या गुन्हेगारीवर डॉ. पिपाडांचा पोलिस महासंचालकांना भावनिक पत्र " श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु...
राजकीयशिर्डी

घातपाताची शक्यता नाही-पण चौकशी आवश्यक – शिर्डीत रामदास आठवले यांचे वक्तव्य

शिर्डी : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असून राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री Ramdas Athawale यांनी व्यक्त केली. ते शिर्डी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


आठवले म्हणाले की, अजित दादा हे अत्यंत संघर्षशील, प्रशासनाचा मोठा अनुभव असलेले आणि जनतेशी थेट संवाद ठेवणारे नेते होते. अनेक वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे महायुतीसह संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे.


दरम्यान, या घटनेशी संबंधित काही तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा होत असल्याबाबत बोलताना त्यांनी Praful Patel यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत सावध भूमिका घेतली. एखाद्या कार्यक्रमाला किंवा लग्नसमारंभाला उपस्थित राहिल्यामुळे कोणावरही थेट आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र संबंधित विमान कंपनी, उड्डाणाची परवानगी आणि तांत्रिक बाबींची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.


विमान उड्डाणासाठी योग्य परिस्थिती नसताना परवानगी का देण्यात आली, लँडिंगसाठी अडचण असताना विमान दुसऱ्या विमानतळावर वळवले का गेले नाही, तसेच पायलट किंवा यंत्रणेमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, याचा तपास झाला पाहिजे. दोषींना कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.


घातपाताच्या शक्यतेबाबत बोलताना आठवले म्हणाले की, अजित दादा हे सर्व पक्षांमध्ये मित्रत्वाचे संबंध ठेवणारे नेते होते. त्यांचे कोणाशीही वैर नव्हते. त्यामुळे या घटनेत घातपात असल्याची शक्यता वाटत नाही. मात्र ही घटना अत्यंत दुर्दैवी असून नेमके कारण समोर यावे यासाठी निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button