Letest News
शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश गॅस साठी हवालदिल शिर्डी-24 तासांत व्यवस्था सुधारा अन्यथा आमरण उपोषण – समीर विर यांचा एल्गार शिर्डीत ‘गणेश गॅस एजन्सी’चा काळाबाजार उफाळला रांगेत श्रीमंतांना मागच्या दाराने सिलेंडर – प्रशासन झोप... मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय
क्राईमशिर्डी

महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीच्या शिवावर मास विक्रीवरून तणाव वादातून हातघाई-पोलिसांची तातडीची कारवाई

महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीच्या शिवावर मास विक्रीवरून तणाव वादातून हातघाई-पोलिसांची तातडीची कारवाई,

शिर्डी | प्रतिनिधी
Shirdi शहरात महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी घडलेल्या एका घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिवावर पेट्रोल पंपासमोर एका व्यक्तीने स्कूटीवरून मास विक्री सुरू केल्याची माहिती समोर आली. धार्मिक सणाच्या दिवशी मास विक्री होत असल्याचे पाहून काही स्थानिक नागरिकांनी संबंधित व्यक्तीस जाब विचारला.
🔥 धार्मिक भावना विरुद्ध व्यवसायाचा प्रश्न
महाशिवरात्रीसारख्या धार्मिक महत्त्वाच्या दिवशी अशा प्रकारे उघडपणे मास विक्री करणे योग्य नसल्याचे सांगत काही नागरिकांनी आक्षेप घेतला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विचारणा होताच संबंधित व्यक्तीने संतप्त प्रतिक्रिया देत वाद घालण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. काहींनी त्याच्या बोलण्याची पद्धत आक्षेपार्ह व उर्मट असल्याचा आरोप केला आहे.
⚠️ वादातून हातघाई; नागरिकांचा संताप अनावर
परिस्थिती क्षणाक्षणाला चिघळत गेली आणि वादाचे रूपांतर हातघाईत झाले. काही नागरिकांनी संबंधित व्यक्तीस मारहाण केल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. घटनेदरम्यान परिसरात मोठी गर्दी जमली होती. काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी पोलिसांना संपर्क साधला.
🚔 पोलिसांची एंट्री; चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्तीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले असल्याचे समजते. तसेच मारहाण करणाऱ्यांचीही ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही बाजूंची जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
📢 शहरात चर्चा; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात विविध स्तरावर चर्चा रंगली आहे. धार्मिक भावना, सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय, तसेच कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती या सर्व मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने स्पष्ट आणि ठोस भूमिका घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. पुढील काही दिवस पोलिसांची विशेष नजर या भागावर राहण्याची शक्यता आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button