Letest News
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर
राजकीयशिर्डी

डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

शिर्डी, दि. (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिपत्याखालील उप माहिती कार्यालय, शिर्डी येथे प्रशासकीय बदलीने नियुक्त झालेल्या डॉ. मीरा ढास यांनी सोमवारी माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यानिमित्त दैनिक साईदर्शन परिवाराने त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.
डॉ. ढास यांनी जुलै २००८ मध्ये माहिती व जनसंपर्क विभागात उपसंपादक म्हणून मंत्रालय, मुंबई येथे सेवेला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा माहिती कार्यालय, पुणे तसेच विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथे सहाय्यक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे नांदेड येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांची प्रशासकीय बदली शिर्डी येथे झाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गाडीलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. ढास यांनी शासनाच्या जनकल्याणकारी योजना, विकासकामे आणि विविध उपक्रमांची माहिती प्रभावी संवाद माध्यमे व समाजमाध्यमांच्या सहाय्याने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. शिर्डी हे जागतिक स्तरावरील श्रद्धास्थान असल्याने येथे येणाऱ्या लाखो साईभक्तांपर्यंत शासनाच्या सकारात्मक उपक्रमांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


यावेळी उप माहिती कार्यालयातील कर्मचारी मंगेश रसाळी व अभिजीत मुठे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. मीरा ढास यांचे स्वागत केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी दैनिक साईदर्शन परिवाराकडूनही डॉ. मीरा ढास यांना नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. 🌹

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button