Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
क्राईमशिर्डी

चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ!

शिर्डी | प्रतिनिधी :
दुकान सुरू असतानाच अवघ्या पाच मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने किराणा दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील ७ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शिर्डी परिसरातील गायकवाड वस्ती, बिरोबा रोड येथे घडली. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत विशाल बाबासाहेब अहिरे (वय २८, रा. गायकवाड वस्ती, बिरोबा रोड, राहाता) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे ‘साईप्रसाद किराणा जनरल स्टोअर्स’ नावाचे दुकान असून त्यांच्या आई शोभा अहिरे या दुकान चालवतात.
फिर्यादीनुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता दुकान सुरू असताना शोभा अहिरे काही वेळासाठी घरी गेल्या. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत, म्हणजे सुमारे ११.३५ वाजता त्या पुन्हा दुकानात परतल्या. मात्र या अल्पावधीतच अज्ञात चोरट्याने उघड्या दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दरम्यान, विशाल अहिरे हे कोपरगाव येथे असताना त्यांच्या आईचा फोन आला आणि दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते शिर्डीत परत आले. दुकानात पाहणी केली असता सकाळी मोजून गल्ल्यात ठेवलेली ७,५०० रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दुकानात तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही रक्कम न मिळाल्याने अज्ञात चोरट्यानेच ही रोकड चोरून नेल्याची खात्री झाली. चोरीस गेलेल्या रकमेत ५०० व १०० रुपयांच्या चलनी नोटांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


दुकान सुरू असतानाच चोरी; चोरट्याने साधला नेमका डाव
विशेष म्हणजे दुकान बंद नसताना आणि केवळ काही मिनिटांसाठी आई दुकानाबाहेर गेल्याची संधी साधून चोरट्याने गल्ल्यावर डल्ला मारला. त्यामुळे परिसरातील दुकानांमध्येही या घटनेनंतर सतर्कता वाढली आहे.
पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास चोरट्याचा माग काढण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button