Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरराजकीय

श्रीराम आणी स्वामी समर्थ यांच्या विषयी बोलणाऱ्या मूर्ख महारावं चा व जाणत्या नेत्यांचा निषेध हिंदू समाजाने करावा

कळस (प्रतिनिधी):

sai nirman
जाहिरात

प्रभू श्रीराम व स्वामी समर्थ यांच्या विषयी बोलणाऱ्या मूर्ख महारावं व त्यांच्या वक्तव्याला मुक संमती देणाऱ्या जाणत्या नेत्याचा निषेध हिंदू समाजाने केला पाहिजे असे स्पष्ट मत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान नेवासा चे मठाधीपती ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले. महारावं व त्यांचे स्टेज वर असणाऱ्या नेत्यांचा भाविकांनी दोन्ही हात वर करून निषेध केला.

DN SPORTS


अमृतवाहिनी प्रवरामातेच्या तीरावर वसलेल्या ब्रह्मलीन प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र कळस बु येथे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये काल्याचे कीर्तनात निरूपण करताना बोलत होते.

kamlakar

यावेळी अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त विष्णू महाराज वाकचौरे, गणेश महाराज वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजपा सोशल मीडिया सेल चे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे आदी उपस्थित होते.


मंडलिक महाराज हे बोलताना म्हणाले, हिंदू धर्म सहिष्णू असल्याने हिंदू धर्माची टिंगल करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. धर्मनिरपेक्षता ही बेगडी असून ती फक्त हिंदू धर्मा विरोधात राबविली जाते.

हिंदू धर्मातील देव देवता, साधू संत यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अपप्रवृत्ती चा व ज्यांच्या समोर केला असे वक्तव्य केले ते महाराष्ट्रातील स्वतःला जाणते नेते म्हणून घेणाऱ्या च्या मुक संमतीचा निषेध हिंदू समाजाने केला पाहिजे.

धर्म आणी संस्कृतीला बाधा आणण्याची खोटी धर्मनिरपेक्षता बेगडी आहे. यात फक्त हिंदू धर्माला लक्ष केल जात.
हिंदू धर्म कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही. भारत भूमी नेहमी विश्व बंधुत्वाचा संदेश देत असते. हिंदू धर्मातून निर्माण झालेले धर्म, पंथ यांचा सुद्धा राग केला नाही.

जाती पाती मध्ये भांडणे लावून फुट पाडण्याचे काम केले जात आहे. देश सुरक्षित राहण्यासाठी संस्कृती टिकली पाहिजे यासाठी हिंदू समाज संघटित झाला पाहिजे.
आपल्या देशाच्या चोहो बाजूनी अपप्रवृत्ती असून अमेरिका, चिन, पाकिस्तान आपले देशाला हानी पोहचविण्याचे काम करीत आहे.

गीता , गाथा यांचे ज्ञान आपल्या पुढील पिढीला मिळाले पाहिजे. तरुणांनी कोणाचे दास न होता राजकारणा पासून दूर राहिले पाहिजे, तरुणी नी आपला जोडीदार निवडताना त्यांचे संस्कार पाहिले पाहिजे. झगामगत्या दुनिया च्या नादी लागू नये. आभासी जगाच्या मागे पळू नका असा मंडलिक महाराज यांनी सल्ला दिला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button