Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

शरद पवार यांचा सरपंच पदाच्या स्थगितीचा अर्ज नामंजूर जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे

सह्यांचे अधिकार स्वतःकडे ठेवण्यासाठी केविलवाणी धडपड करणारे शरद पवार यांनी सादर केलेली बनावट कागदपत्र फेटाळून अपर विभागीय आयुक्त, नाशिक यांनी चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर येथील सरपंच पदाच्या स्थगितीचा अर्ज नामंजुर केल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष श्री. सुधीर भद्रे यांनी दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

चिचोंडी पाटील ता. जि. अहिल्यानगरचे सरपंच शरद खंडू पवार यांनी त्यांच्या बंगल्याच्या पुढे व मागे आणि एस. टी. स्टॅण्ड येथील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा तक्रार अर्ज सुधीर भद्रे यांनी मा. जिल्हाधिकार अहिल्यानगर यांच्याकडे दाखल केला होता. या अर्जानुसार आणि सत्य परिस्थितीनुसार शरद खंडू पवार यांचे सदस्यासह सरपंच पद रद्द झाले. या आदेशाविरुद्ध शरद पवार यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले.

अपिलामधे शरद पवार यांनी व त्यांचे वकिलांनी असा युक्तीवाद केला की बंगल्याच्या समोर आणि मागे अतिक्रमण कुणी केले हे त्यांना माहीत नाही. शरद पवार त्या बंगल्यात राहत नाही. एसटी स्टँड वरील अतिक्रमण त्यांचे नसून सुधीर भद्रे अथवा दिलीप कोकाटे यांनीच केले असावे असा कांगावा केला. तर दुसऱ्या वेळेस एसटी स्टॅण्डवर चाँद जाफर शेख यांनी अतिक्रमण केले असल्याचे बनावट कागदपत्र दाखल केले.

अपिलाचे सुनावणी वेळी ज्या सरपंचांना स्वतःच्या बंगल्याच्या समोर आणि पाठीमागे अतिक्रमण कुणी केले आहे हे माहिती नसेल तर ते गाव कसे चालवत असतील असा तोंडी युक्तीवाद ज्येष्ठ विधिज्ञ सचिन चांगदेव इथापे यांनी केला. अतिक्रमण सिद्ध झाल्यामुळेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी पद रद्द केल्याची आणि सदर निकाल हा योग्य व निर्दोष असल्याची बाजू मांडली.

स्वतःच्या सरपंच पदाची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी न्यायालयासमोर अनेक बनावट कागदपत्र सादर करून आणि अनेक कोलांट्या उड्या मारूनही अपर विभागीय आयुक्त श्री. अजय मोरे यांनी अगदी अचुक निकाल दिल्याबद्दल सुधीर भद्रे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button