Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
अ.नगरक्राईम

गुन्हेगारांचा कर्दनकाळ व्हा!’ – राजकीय दबाव झुगारून संघटित टोळ्यांचा बिमोड करा- आयजी संजय येनपुरे यांचा पोलिसांना इशारा

अहिल्यानगर : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी संघटित गुन्हेगारी, खून, खंडणी, दहशत आणि टोळ्यांची वाढती मुजोरी यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत स्पष्ट शब्दांत इशारा देत, “कोणत्याही राजकीय दबावाला भीक घालू नका. संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा संपूर्ण बिमोड करा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही,” असे कडक निर्देश दिले.
अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख गुन्हेगारीमुळे नव्हे, तर कायद्याच्या धाकामुळे झाली पाहिजे, असे सांगत येनपुरे यांनी सराईत गुन्हेगार, खंडणीखोर, अवैध शस्त्र बाळगणारे आणि दहशत माजवणाऱ्या टोळ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश दिले. गुन्हेगार कोणाच्याही राजकीय छत्रछायेखाली असला तरी त्याला कायद्याचा हिसका दाखविण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गुन्हा घडल्यानंतर पंचनामे आणि तपास करण्यापेक्षा गुन्हे घडणारच नाहीत अशी परिस्थिती निर्माण करा, असे सांगत प्रत्येक पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील गुन्हेगारांवर सातत्याने वचक ठेवावा, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक तेथे कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले.
अलीकडील गंभीर घटनांमुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष मैदानात उतरून संघटित गुन्हेगारीचा कणा मोडावा, अशीच जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या या स्पष्ट आणि कठोर भूमिकेनंतर आता जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोठी धडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button