Letest News
माजी खासदार विखेंवर अॅड. सुरेश लगड यांचा घणाघाती हल्ला "चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत ठेवा" दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव्याला यश- पोलीस खात्यातील बोका शंकर चौधरी निलंबित-आता बडतर्फीची मागणी जोर... साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात
अ.नगरक्राईम

माजी खासदार विखेंवर अॅड. सुरेश लगड यांचा घणाघाती हल्ला “चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत ठेवा”

अहिल्यानगर | प्रतिनिधी
दूध भेसळीविरोधात राज्यभर धडक कारवाई करून भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. सुरेश लगड यांनी जोरदार पलटवार केला आहे. “संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांना वठणीवर आणण्याचे काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कामात खो घालण्याचे काम कोणत्याही राजकीय नेत्याने करू नये. अशा वक्तव्यांमुळे भेसळखोरांचेच मनोबल वाढते,” असा इशारा त्यांनी दिला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अॅड. लगड म्हणाले की, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे सामान्य ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे, हा उद्देश आहे. त्यामुळे त्यांच्या कामावर शंका घेण्याऐवजी अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.
विखे यांनी “पूर्वीच्या अधिकाऱ्यांनीही काम केले, मग मुंढे यांनाच एवढी प्रसिद्धी का?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अॅड. लगड यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, “यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनीही अशाच धाडसी पद्धतीने कारवाई केली असती तर त्यांनाही जनतेने डोक्यावर घेतले असते. प्रसिद्धी ही पदामुळे नाही, तर कामामुळे मिळते. चांगले काम करणाऱ्याला शाबासकीची थाप देण्याची दानत ठेवली पाहिजे.”


त्यांनी पुढे आव्हान देत विचारले, “तुकाराम मुंढे यांनी कोणत्या अधिकाऱ्यावर दबाव टाकून खोटे पंचनामे करण्यास सांगितले? असा ठोस पुरावा असेल तर त्याचा सविस्तर खुलासा करावा आणि मुख्यमंत्री यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करावी. केवळ आरोप करून कार्यक्षम अधिकाऱ्याची प्रतिमा मलीन करणे योग्य नाही.”
अॅड. लगड यांनी विखे कुटुंबाच्या राजकीय जबाबदारीची आठवण करून देत म्हटले की, “आपण माजी खासदार आहात. आपले वडील राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे प्रत्येक विधान हे जबाबदारीने आणि विचारपूर्वक केले पाहिजे.”


शेवटी त्यांनी सुचविले की, “दूध भेसळखोरांची बाजू घेण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर कसा मिळेल, त्यांच्या अडचणी कशा दूर होतील यासाठी प्रयत्न करा. त्यातून लाखो शेतकऱ्यांचे भले होईल आणि तेच आपल्यासाठी खरे लोकहिताचे काम ठरेल.”

“भेसळखोरांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करू नका. चांगले काम करणाऱ्याचे कौतुक करा; भेसळखोरांना अप्रत्यक्ष पाठबळ देणारी वक्तव्ये टाळा. लोकप्रतिनिधींनी जनहिताला प्राधान्य द्यावे.”
— अॅड. सुरेश लगड, ज्येष्ठ विधीज्ञ

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button