Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
Blog

दहा वर्षात महात्मा फुले जीवनदायी योजनेत विमा कंपनीकडून तब्बल 300 कोटी साईबाबांच्या तिजोरीत जमा..!

विश्वाला श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणा-या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून सुमारे ३०० करोडहून अधीक रुपये श्री साईबाबा संस्थानच्या तिजोरीत जमा झाले असून दहा वर्षात या योजनेंतर्गत ३० हजार रुग्णांनी उपचार
केले आहे.श्री साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेल्या रुग्णसेवेचा वसा आजतागायत साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुरू आहे.याठिकाणी राज्यातूनच नव्हे तर देशाच्या विविध राज्यातून केवळ साईबाबांच्या श्रद्धेपोटी दुर्धर आजाराने ग्रासलेले रुग्ण येत असतात.अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्या रुग्णांना इतरत्र ठिकाणी उपचार करुन गुण येत नाही आणि शेवटी डॉक्टर घरीच राहण्याचा सल्ला देतात अशी रुग्ण शेवटी साईबाबांच्या चरणी धावा घेऊन या रुग्णालयात उपचार घेऊन बरे होतात हे सत्य आहे.साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सर्वप्रथम सन २०१३ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा प्रारंभ झाला.सन २०१४ ते २०१५ या कालखंडात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नामांतर करून ते महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना करण्यात आले.
सुरवातीला या योजनेचा मेडिकल कॉर्डीनेटरचा कार्यभार पहाण्यासाठी साईसंस्थानच्या रुग्णालयातील एका पाठोपाठ एक अशा दोघा डॉक्टरांवर जबाबदारी सोपविण्यात आली मात्र अल्प काळातच ते दोघेही सदरची जबाबदारीतून मुक्त झाले.त्यानंतर डॉ प्रितम वडगांवे यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली ती त्यांनी अगदी यशस्वीपणे पूर्ण करुन आज महात्मा फुले जीवनदायी योजनेत साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे नांव अव्वल स्थानावर आणून दाखवले.आजपर्यत साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील सुमारे तीस हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे.यामध्ये हृदयरोग, मेंदूविकार, रक्तशुद्धीकरण आदी आजाराने ग्रासलेल्या रुग्णाचा समावेश आहे.तर दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रीय विमा कंपनीकडून साईबाबा संस्थानच्या तिजोरीत आतापर्यंत ३०० करोडपेक्षा अधीक रक्कम जमा झाली आहे.राज्यात या योजनेच्या माध्यमातून अनेक नामवंत रुग्णालये लाभ मिळतो परंतु शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी एकमेव रुग्णालय ठरले आहे की विमा कंपनीकडून पैसे मिळविण्यात अव्वल स्थानावर आहे.या योजनेचा लाभ गोरगरीब रुग्णांना मिळावा यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीने रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली असून या विभागात एकूण १६ कर्मचारी रात्रंदिवस काम करत असतात.या कर्मचाऱ्यांचे पगार देखील साईबाबा संस्थान प्रशासनाच्या वतीने केले जातात.डॉ प्रितम वडगांवे यांनी या विभागात गेल्या दहा वर्षात अतिशय शिस्तबद्ध आणी प्रामाणिकपणे काम करुन रुग्यालयाचा नावलौकिक राज्यभर पसरवला आहे.याची राज्य सरकारने दखल घेत मागील वर्षी १५ ऑगस्ट २०२२ रोजी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते डॉ प्रितम वडगांवे यांनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी साईबाबा संस्थानच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना विभागातील गणेश इनामके, सतिष कोते,श्री भवर आदी उपस्थित होते.याव्यतीरीक्त डॉ प्रितम वडगांवे यांच्याकडे साईबाबा रुग्णालयाचा उप संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संचालक पदावर असतांना कोव्हिड काळात त्यांनी सुमारे १० हजार रुग्णांना जीवनदान देण्याचे काम केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button