Letest News
बंगालच्या साईभक्ताने अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी साई आश्रयातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलला आ... साई मंदिरात नावाचा खेळ! शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या नावाने एक्झिट गेटमधून प्रवेश साईचरणी तब्बल ९४ लाख ८६ हजारांचे सुवर्ण-रजत घड्याळ अर्पण! राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक
क्राईमशिर्डी

साई मंदिरात नावाचा खेळ! शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या नावाने एक्झिट गेटमधून प्रवेश

साई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेला बगल; व्हीआयपी प्रवेशाच्या नावाखाली नेमके चालले तरी काय?
शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबांच्या पवित्र द्वारकामाई मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी चक्क शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांच्या नावाचा कथित गैरवापर करण्यात आल्याचा गंभीर प्रकार १२ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला आहे. मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेला बगल देत एक्झिट गेटमधून साईभक्तांना प्रवेश दिल्याच्या या प्रकारामुळे शिर्डीतील मंदिर सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कोते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी द्वारकामाई मंदिरात साईभक्तांची मोठी गर्दी होती. यावेळी सागर अरविंद महेश्वरी यांनी दिल्ली येथून आलेल्या काही साईभक्तांना कोणतीही पूर्वपरवानगी किंवा संमती न घेता कमलाकर कोते यांचे नाव सांगून थेट मंदिराच्या एक्झिट गेटमधून आत प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कोते यांनी साई संस्थानच्या संरक्षण विभागाकडे विचारणा केली असता, संबंधित प्रकार घडल्याचे सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एखाद्या लोकप्रतिनिधी अथवा पदाधिकाऱ्याचे नाव परस्पर वापरून सुरक्षा कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणे आणि मंदिराच्या प्रवेश व्यवस्थेत हस्तक्षेप करणे हा गंभीर विषय असल्याचे कोते यांनी म्हटले आहे.


नावाचा वापर करून सुरक्षा व्यवस्थेला आव्हान?
साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक शिर्डीत येतात. अशा परिस्थितीत मंदिराच्या प्रवेशद्वारांवर कडक सुरक्षा व्यवस्था असणे अपेक्षित आहे. मात्र, एखाद्याचे नाव सांगून एक्झिट गेटमधून प्रवेश मिळत असेल, तर ही सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी मानावी लागेल. उद्या अशाच प्रकारे कोणत्याही व्यक्तीचे नाव वापरून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.


सीसीटीव्ही तपासा, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवा!
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी द्वारकामाई मंदिरातील संबंधित वेळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवावेत, नावाचा अनधिकृत वापर करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कमलाकर कोते यांनी पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, साईबाबांच्या मंदिरात व्हीआयपी प्रवेशाच्या नावाखाली नियमांना बगल दिली जात असेल, तर सामान्य साईभक्तांनी रांगेत उभे राहूनच दर्शन का घ्यावे? सुरक्षा नियम सर्वांसाठी समान आहेत की काहींच्या नावाने त्यांना वाकवले जातात? असा संतप्त सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. आता शिर्डी पोलीस आणि साई संस्थान प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे साईभक्तांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button