शिर्डी प्रतिनिधी /
काही दिवसापूर्वी श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कडक कारवाई सुरू करण्यात आली होती मात्र कारवाईचा जोर ओसरताच शिर्डीसह राहता तालुक्यात तीन चाकी अप्पे व रिक्षा वाहन चालक हे भंगारातील पंधरा वर्षे जुनी असलेली वेगवेगळ्या जिल्ह्यातील पासिंग असलेली स्क्रॅप वाहने आणून पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे रस्त्यावर
चालवत असून काही महाभागांनी एक लाईटच्या जागेवर जास्त प्रकाश पडणारी दोन लाईट लावलेली असून काहींनी काचेवरच वेगवेगळ्या संघटनेची नावे तर काहींनी प्रेसचे फोटो लावलेले आहे काही दिवसापूर्वी पोहेगाव शिवारात झालेल्या अपघातात पाच जणांना जीव गमवावा लागला होता
त्याचा विसर परिवहन विभागाला पडलेला दिसून येतो शिर्डीत शासनाने पंधरा वर्ष नंतर ज्या गाड्या रस्त्यावर चालवल्या नाही पाहिजेत त्या गाड्या राजरोसपने शिर्डीत चालत आहेत असे शिर्डी पोलिस वाहतूक शाखेकडून माहिती अधिकारात विविध माहिती मिळाली आहे.हेच रिक्षा चालक भरदिवसा मद्यपान करून भररस्त्यात कुठेही आपली वाहने उभी करतात
त्याचा साईभक्तांना मोठा त्रास होतो आहे,यातील अनेक चालकांकडे बॅच व लायसन्स देखील नाहीत, काही वाहनांचे कागदपत्रेच नाहीत, तरीही ही वाहने रस्त्यावर चालत आहे, शिर्डी वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन विभाग श्रीरामपूर यांच्या आशीर्वादाने अनाधिकृत जुनाट प्रदूषण वाढवणारे विना परमिट रिक्षा / अपे वाहने चालत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे
म्हणून ह्या वाहनांकडे जातीने लक्ष घालून ज्याच्याकडे कागदपत्रे नाहीत लायसन्स नाहीत अशा वाहनावर कठोर कारवाई करून सदरील वाहने जप्त (जमा) करून घेण्यासाठी पावले उचलुन कारवाई करावी अशी मागणी दैनिक साईदर्शनने अर्जाद्वारे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, शिरसगांव ता. श्रीरामपूर यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे