Letest News
भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न!
Blog

माझी माती माझा देश’ अभियानामुळे नागरिकांमध्ये एकतेची भावना अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी

अहमदनगर दि. 20 ऑक्टोबर (जि.मा.का.वृत्तसेवा ) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात ‘माझी माती माझा देश’ हे अभियान अतिशय चांगल्याप्रकारे राबविण्यात आले असून या अभियानांमुळे नागरिकांमध्ये एकतेची भावना निर्माण होत आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.

sai nirman
जाहिरात
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहा आयोजित 'माझी माती माझा देश' अमृत कलश जिल्‍हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्‍याच्‍या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

        यावेळी  महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, नगर पालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर, मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, तहसीलदार शिल्पा पाटील, नेहरू युवा केंद्राचे शिवाजी खरात आदी उपस्थित होते.

        सुहास मापारी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या 'माझी माती माझा देश' या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रभागात विविध कार्यक्रम आयोजित करून अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. या ठिकाणी संकलित झालेले अमृत कलश मुंबई येथे व तेथून राजधानी दिल्लीला एकत्रित होणार असून त्या ठिकाणी अमृत वाटिका साकारण्यात येणार आहे.  या कार्यक्रमातून जनमानसमध्ये एक नवचैतन्य निर्माण होऊन एकतेचा संदेश यातून दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच क्षेत्रातून आणि सर्व गावात अमृत कलश संकलित करण्यात आले. यावेळी संकलित झालेल्या कलशांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नगरपरिषद, नगरपंचायत तसेच महानगरपालिकेच्या कलशांचे एकत्रिकरण करण्यात येऊन अमृत कलश अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे सहायक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले तर शेवटी तर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, विजय बडे यांनी आभार मानले.

        या कार्यक्रमास हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, मनपा चे शशिकांत नजान यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या नगर परिषदांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button