Letest News
विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख!
राजकीयशिर्डी

शिर्डीत वादळापूर्वीची धोकादायक शांतता- निवडणुकीत खऱ्या नेत्याचा ठसा गायब!

शिर्डी नगरीत आज अशी शांतता आहे की जणू उद्या प्रचंड वादळ धडकणार आहे. निवडणुकीच्या काळात शहरात गंभीर चर्चा सुरू आहे—शिर्डीसाठी खरे नेतृत्व नेमके कोणाकडे आहे? कारण रिंगणात दिसणाऱ्या चेहऱ्यांमध्ये दूरदृष्टी, अभ्यास, अनुभव आणि शहराबद्दल तळमळ असलेला एकही पक्का नेता दिसत नाही, ही वस्तुस्थिती आता उघडपणे बोलली जात आहे.

sai nirman
जाहिरात

गणेश मंडळही सांभाळले नाही… आणि आता नगरपरिषदेचा दावा? शिर्डीकरांचा संताप वाढला

ज्या लोकांनी कधी साधं समाजकार्य किंवा मंडळाची जबाबदारीही नीट सांभाळली नाही, तेच आज राजकारणात पुढे सरसावण्याचा प्रयत्न करत आहेत. शिर्डीतली जनता खुल्या शब्दांत सांगू लागली आहे की—
“काम काहीच नाही… पण खुर्चीची महत्त्वाकांक्षा मात्र आभाळाएवढी!”

DN SPORTS

दोन नंबरचे धंदे करून पैसे कमावले… आता तोच पैसा राजकारणात? बाबांच्या नगरीला ही काळी छाया नकोच!

दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डीत, दोन नंबरच्या व्यवहारांतून वाढलेली मंडळी आज राजकारणात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबांच्या नगरीत अशा लोकांचे अस्तित्वही लाजिरवाणे—आणि नेतृत्व तर दूरची गोष्ट!

भाविक, व्यापारी, सर्वसामान्य जनता एकमुखाने बोलत आहेत:
“शिर्डीला माफिया नव्हे… नेता हवा!”


भाविकांचा सुरक्षिततेचा प्रश्न, व्यापाऱ्यांचे भविष्य, शहराचा विकास—शिर्डीला आता भक्कम नेता हवाच!

शिर्डी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील भाविकांची नगरी. दररोज हजारो साईभक्त शहरात येतात.
त्यांच्या सुरक्षिततेसाठी, वाहतुकीसाठी, स्वच्छतेसाठी, व्यापाऱ्यांच्या स्थैर्यासाठी आणि शहराच्या 25 वर्षांच्या भविष्यासाठी आज हवा आहे निर्भीड, अभ्यासू, कणखर आणि दूरदृष्टा नेता.

kamlakar

निवडणूक म्हणजे खेळ नाही…
जो उठेल तो उमेदवार… असं शिर्डीत चालणार नाही.

शेवटी एकच गोष्ट जास्त बोलली जाते—
“चाव्या कितीही तयार होऊद्या… पण शिर्डीचं कुलूप मात्र भक्कम आहे!”


— शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त
किरण एस. गोंदकर पाटील

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button