Letest News
राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती?
अ.नगरक्राईम

राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” रडारवर-अप्पर पोलीस अधीक्षक अ‍ॅक्शन मोडमध्ये

राहाता : पिंपरी निर्मळ येथील निळवंडे कॅनॉल परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणाने आता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला साधा गुन्हा वाटणारे हे प्रकरण आता भीषण आणि संघटित “मोबाईल गर्भलिंग रॅकेट” असल्याचे समोर येत असून, तपासात रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांच्या तपासाचा फास आता केवळ राहाता किंवा नेवासा पुरता मर्यादित नसून, त्याचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत पोहोचल्याने अनेक डॉक्टर, एजंट आणि आर्थिक साखळ्या रडारवर आल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणातील आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडीची जोरदार मागणी केली. तपासाची व्याप्ती वाढत असल्याचे सांगत न्यायालयाने आरोपींना १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतापर्यंत या प्रकरणात तब्बल १२ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये २ डॉक्टर, ४ एजंट आणि ६ गर्भवती महिलांचे पती यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे श्रीरामपूर येथील एका डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आली असून, या डॉक्टरच्या दवाखान्यात अनेक संशयास्पद गर्भपात झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

पुणे कनेक्शन उघड; मशीन पुरवठादारही जाळ्यात येणार? ⚠️
तपासात आज आणखी दोन आरोपींची भर पडली असून हे दोघेही पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. नेवासा येथील डॉ. राहुल भनगे आणि मुख्य एजंट प्रदीप ढगे यांनी वापरलेले पोर्टेबल सोनोग्राफी मशीन पुण्यातील आरोपींकडून खरेदी केल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.
हे मशीन कोणत्या मार्गाने आणले गेले? त्यासाठी बनावट कागदपत्रे वापरण्यात आली का? अजून किती मशीन राज्यभर फिरत आहेत? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. पुण्यातील या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यासाठी विशेष पथके रवाना होण्याची शक्यता असून, या चौकशीतून आणखी मोठे रॅकेट समोर येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.


“मोबाईल क्लिनिक” पद्धतीने सुरू होता काळा धंदा 🚘
तपास यंत्रणांनी उघड केलेली रॅकेटची कार्यपद्धती अक्षरशः थरकाप उडवणारी आहे. एजंट आधी विविध गावांमधून ८ ते १० गर्भवती महिलांना गुप्तपणे एकत्र करत होते. त्यानंतर ठराविक दिवस आणि वेळ ठरवून महिलांना त्यांच्या पती किंवा नातेवाईकांसह एका ठिकाणी बोलावले जात होते.
महिला आल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्याकडून रोख रक्कम उकळली जात होती. त्यानंतर महिलांच्या पतींना किंवा नातेवाईकांना दुसरीकडे थांबवले जात असे. एजंट त्या महिलांना चारचाकी वाहनातून पूर्णपणे गुप्त आणि अज्ञातस्थळी घेऊन जात होते.

“तेथे विना नोंदणीकृत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग तपासणी केली जात होती. तपासणी झाल्यानंतर महिलांना पुन्हा मूळ ठिकाणी आणून सोडण्यात येत होते. पोलिसांच्या मते, पुरावे नष्ट व्हावेत आणि ठिकाण निश्चित होऊ नये यासाठी सतत जागा बदलल्या जात होत्या.


डॉक्टरला १० हजार, एजंटला कमिशन; पैशासाठी मृत्यूचा खेळ 💰
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, प्रत्येक गर्भलिंग तपासणीमागे संबंधित डॉक्टरला १० हजार रुपये, तर एजंटला ३ हजार रुपये किंवा त्याहून अधिक कमिशन मिळत होते. जर एकापेक्षा जास्त एजंट असतील तर त्यानुसार रक्कम वाढवली जात होती.
या रॅकेटमध्ये महिलांना आणणारे एजंट, वाहन चालक, डॉक्टर, मशीन पुरवठादार आणि गर्भपात करणारे दवाखाने अशी संपूर्ण “चेन” कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे हा केवळ एक गुन्हा नसून मोठ्या आर्थिक व्यवहारांशी जोडलेले संघटित नेटवर्क असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

तीन महिलांचे बेकायदेशीर गर्भपात; आणखी धक्कादायक खुलास्यांची शक्यता 🚨
तपासादरम्यान पोलिसांनी गर्भलिंग तपासणी झालेल्या महिलांचा शोध सुरू केला असून अनेक महिलांचे जबाब नोंदवले जात आहेत. त्यापैकी तीन महिलांचे गर्भपात करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हे गर्भपात अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरांच्या दवाखान्यात एजंटांच्या मदतीने करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांना आता आणखी काही महिलांचे धागेदोरे मिळाले असून, त्यातून आणखी बेकायदेशीर गर्भपात उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुन्ह्यांचे स्वरूप अधिक गंभीर बनले आहे.


मोठे मासे” रडारवर; आणखी डॉक्टर आणि एजंटांची झोप उडाली 🔥
जप्त करण्यात आलेले सोनोग्राफी मशीन, मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, बँक ट्रान्झॅक्शन, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींचे यांची बारकाईने चौकशी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहाता तालुक्यासह जिल्ह्यातील काही प्रसिद्ध डॉक्टर आणि प्रभावशाली एजंट आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
या रॅकेटमधील “मोठे मासे” पकडण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास यंत्रणा सक्रिय केल्याची माहिती असून, लवकरच आणखी धडक कारवाया होण्याची शक्यता आहे. काही आरोपी फरार असल्याचीही माहिती समोर येत आहे.


अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे अ‍ॅक्शन मोडमध्ये ⚡
या संपूर्ण प्रकरणावर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे स्वतः बारकाईने लक्ष ठेवून असून, तपास जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे.
“गर्भलिंग तपासणीसारखा अमानुष आणि बेकायदेशीर प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. चुकीचे काम करणाऱ्यांना माफी नाही. या रॅकेटमधील प्रत्येकाला कायद्यापुढे आणले जाईल,” असा कठोर संदेश तपास यंत्रणेकडून देण्यात आला आहे.


“पिंपरी निर्मळ” फक्त सुरुवात? आणखी ठिकाणी तपास सुरू 👁️
पिंपरी निर्मळ येथे उघड झालेले हे प्रकरण केवळ एका मोठ्या राज्यव्यापी साखळीचा “एक दुवा” असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. पोलिसांनी राहाता, नेवासा, श्रीरामपूर आणि पुणे परिसरातील काही संशयित ठिकाणांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
PCPNDT कायद्यानुसार गर्भलिंग तपासणी करणे आणि करवणे हा गंभीर दंडनीय गुन्हा असून दोषींवर कठोर शिक्षा, दंड आणि वैद्यकीय परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र पैशाच्या हव्यासापोटी अजूनही असे अमानुष रॅकेट सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button