Letest News
राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती?
अ.नगरशिर्डी

डॉ राम नाईक ‘वर्ल्ड बुक रेकॉर्ड’ने सन्मानित

समर्पित अतुलनीय सेवेची दखल घेऊन संस्थानने दिली निवृत्तीनंतरही रुग्णसेवेची संधीः
डॉ. राम नाईक, ज्यांनी आपल्या आयुष्यातील २३ वर्षे साईसंस्थानच्या साईनाथ रुग्णालयात रुग्णसेवेत घालवली, त्यांनी तब्बल २ लाख ७३ हजार रुग्णांवर उपचार आणि ६० हजार शस्त्रक्रियांचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या अतुलनीय सेवेची दखल लंडनच्या ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेऊन त्यांना सन्मानित केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


डॉ. नाईक यांचे दि.३१/०३/२०२५ अखेर विहीत वयोमान (६० वर्षे) पूर्ण होत असल्‍याने ते संस्‍थान मधून सेवानिवृत्‍त होणार होते. परंतू त्‍यांची रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण पाहून शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील रुई, नादुर्खी खुर्द व बुद्रुक, साकुरी, पिंपळवाडी, सावळेविहीर खुर्द व बुद्रुक, शिंगवे, निघोज, निमगाव, वाकडी या ११ गावांतील ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे तसेच रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांनीही निवेदनाद्वारे त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

त्यांची समर्पित रुग्णसेवा व लोकांच्या मागणीचा मान राखत संस्थानने डॉ. नाईक यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. नाईक यांचा गौरव सोहळा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी आयोजित केला होता. रुग्णालयाच्या गणवेशातच आलेल्या डॉ. नाईक यांचा संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा प्र से) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी श्री गाडीलकर यांनी साईबाबांच्या ‘सेवा परमो धर्मः’ या शिकवणीनुसार रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. नाईक यांच्या कार्याबद्दल संस्थान कायम ऋणी राहील. देवानंतर डॉक्टर देव असतो राम नाईक तर डॉक्टरांमधला देव आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय इतकी उत्तुंग व समर्पित सेवा करणे हे सामान्य माणसांचे काम नाही. त्यांनी आपल्या सेवेने हजारो लोकांच्या हृदयात स्थान मिळविले असल्‍याचे प्रतिपादन केले.


याप्रसंगी ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’चे महेश वैद्य, रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे आधीसेविका नजमा सय्यद तसेच मोठ्या संख्येने डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button