Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
राजकीयशिर्डी

गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड

ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी बबनराव भुसारी यांची बिनविरोध निवड
घुले बंधूंच्या मार्गदर्शनाखाली निवड; शिर्डीसह राहता तालुक्यात आनंदाचे वातावरण
शिर्डी प्रतिनिधी : शिर्डी येथील प्रसिद्ध उद्योजक, गणेश गॅस एजन्सीचे संचालक तसेच सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात सक्रिय कार्यरत असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. त्यांच्या निवडीमुळे शिर्डीसह संपूर्ण राहता तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले तसेच माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली बबनराव भुसारी यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, शेतकरी हितासाठी असलेली तळमळ, नेवासा व शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण असलेला संपर्क आणि विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग यामुळे त्यांची ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
यापूर्वीही त्यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे सभासद, शेतकरी व सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यशैलीवर दाखविलेला विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.


उद्योग, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे कारखान्याच्या विकासाला नव्या गतीची दिशा मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना बबनराव भुसारी म्हणाले, “घुले परिवाराने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे मोठे समाधान वाटत आहे. यापुढील काळातही शेतकरी, सभासद आणि पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहणार आहे.”
त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी तसेच सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



“सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव, शेतकरी हिताची तळमळ आणि समाजकार्याची अखंड परंपरा यामुळे बबनराव भुसारी यांची संचालकपदी झालेली बिनविरोध निवड ही ज्ञानेश्वर कारखान्यासाठी विकासाची नवी संधी मानली जात आहे.”

अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बबन भुसारी (काका) यांची बिनविरोध निवड ही सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वीही त्यांनी संचालक म्हणून यशस्वीपणे काम पाहिले असून, सहकार क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव आहे. शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्रातील प्रश्नांची सखोल जाण असलेल्या भुसारी यांच्या निवडीमुळे कारखान्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिर्डी व नेवासे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button