Letest News
शिर्डीत 'चिल्लर गँग'चा धुमाकूळ! भाविकांचे मोबाईल-रोकड- पिशव्या लंपास-मध्यरात्री साईनगरीत अल्पवयीन टो... मुसळधार पावसाचा रेड अलर्ट-नदीकाठच्या गावांनी तातडीने सतर्क राहावे! शिर्डीच्या ६ गुन्हेगारांसह ६८ सराईत आरोपी तडीपार श्रीरामपूर विभागाची गुन्हेगारीवर मोठी कारवाई अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो...
अ.नगरक्राईम

ह.भ.प. संगीताताई पवार यांची हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचं स्पष्ट चार संशयित आरोपींना अटक

वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची शुक्रवारी रात्री दगडाने ठेचून हत्या झाली. मोहटादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले. त्यावेळी आश्रमाचे कुलूप गेट तोडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन प्रवेश केला असता संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अधिकारी कर्मचारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले.कीर्तनकार संगीता पवार यांच्या हत्येने राज्यभरात एकच खळबळ उडाली. ही हत्या कोणी व का केली असे प्रश्न निर्माण झाले असताना मृत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही 2007 मध्ये चिंचडगाव मध्ये दीड एकर जमीन घेतली.

तेव्हापासून शेजारचं कुटुंब आमच्याशी वाद घालत होते. त्यानंतर ही जमीन मी मुलगी संगीता हिला दिली. संगीता या जमिनीवर आश्रम बांधणार होती. त्यासाठी जमिनीवर वाळू आणण्यात आली. यावेळी शेजारील कुटुंबाने वाद घातला. 14 एप्रिल रोजी विरगाव पोलीस ठाण्यात शेजारच्या चौधरी कुटुंबाच्या विरोधात तक्रार दिली.

माझ्या मुलीला धोका असल्याचा देखील उल्लेख केला होता. त्यानंतर माझ्या मुलीची हत्या झाल्याचं वडील अण्णासाहेब पवार म्हणाले.

दरम्यान, मृताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार देखील पोलीस तपास करत असून या प्रकरणांमध्ये चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील यामध्ये स्वतः लक्ष घालून आरोपीचा शोध घेत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button