Letest News
अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न...
अ.नगरक्राईम

अवैध वाळू उपशातून रक्तरंजित टोळी युद्ध-एक तरुण मयत-गोदावरी पात्रात फेकल्याची घटना

श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही शासकीय टेंडर नसताना बेकायदेशीर व बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे. दिवसा नदीपात्रातून वाळू उपसा केला जात असून, रात्री डंपर, हायवा व जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक केली जाते. या अवैध धंद्यामुळे संपूर्ण नायगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
अवैध वाळू उपशामुळे गावाला अक्षरशः गुंडगिरीचे स्वरूप प्राप्त झाले असून, वाळू तस्करांच्या दहशतीमुळे गावकरी भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग असल्याने नागरिक उघडपणे आवाज उठवण्यास धजावत नाहीत.
वाळू पॉईंटवरून टोळी युद्ध; ६ ते ७ जण गंभीर जखमी
काल सायंकाळी गोदावरी नदीपात्रात वाळूचा पॉईंट बनवण्याच्या कारणावरून दोन टोळ्यांमध्ये भीषण टोळी युद्ध झाले. या झटापटीत जबर मारहाण करण्यात आली असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
तरुणाला नदीपात्रात फेकले; एकाचा मृत्यू
या टोळी युद्धादरम्यान एका तरुणाला चक्क गोदावरी नदीपात्रात फेकून देण्यात आले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असून, मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. काही वेळाने मृतदेह पाण्यात सापडल्याचे समजते, तर काहींच्या मते तो वाहून गेला होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गोळीबाराची चर्चा; बाहेरील वाळू तस्करांचा सहभाग
या अवैध वाळू उपशामध्ये शेजारील श्रीयाधापूर तालुक्यातील तसेच नायगाव वॉर्ड क्रमांक दोन परिसरातील काही कुख्यात वाळू तस्करांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. काही वाळू तस्करांकडून गोळीबार झाल्याचीही माहिती परिसरात पसरली असून, पोलिसांकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
पोलीस घटनास्थळी; तरीही गुन्हा दाखल नाही
घटना घडताच श्रीरामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, इतकी गंभीर घटना घडूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अवैध वाळू उपशातून थेट खून झाल्याची घटना समोर येऊनही प्रशासन शांत का?
नायगावमधील अवैध वाळू माफियांवर कठोर कारवाई कधी?
याकडे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button