Letest News
प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान
अ.नगरराजकीय

वैद्यकीय पदवी ही स्वतः बरोबरच दुसऱ्याच्या कल्याणासाठी ही हवी–आ. प्रशांत बंब

डॉक्टर ही डिग्री मिळाल्यानंतर स्वत:च्या कल्याणाबरोबरच जनतेच्या कल्याणासाठीही आपले जीवन खर्ची घातले पाहिजे असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी शिर्डी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनींना केले. शिर्डी येथे अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल येथील प्रथम वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेह सम्मेलनाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी येथे अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल येथील प्रथम वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेह सम्मेलनाचा शुभारंभ आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते कऱण्यात आले. आमदार प्रशांत बंब व डॉ.राजेंद्र पिपाडा,प्रशांतजी देसरडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा, अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडीकल कॉलेजचे अध्यक्ष प्रशांत देसरडा,नंदुशेठ लोढा,राखी देसर्डा,संजय लोढा तसेच कॉलेजचे शिक्षक वृंद व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.ते बोलतना म्हणाले की प्रत्येकाच्या जिवनात देव आयुष्याचे सोन कऱण्यासाठी एक संधी देत असतो त्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे.

माझे नावकरी या संस्थेचे प्रशांत देसरडा यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करुन दिली आहे असे मला वाटते. प्रत्येकाच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर होणे म्हणजे जिवनातील प्रत्येक गोष्ट कऱण्यासाठी स्टेज उपलब्ध होते. कोणताही रोग मुळासकट मिटवण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये आहे.

प्रॅक्टीस चालू असताना स्वत:च्या कल्याणाबरोबर दुस-याचे कल्याण केले पाहिजे. तुमचा हा पुढील कार्यक्रम माझ्या मतदार संघात म्हैसमाळ ला घेईल असा मी आपल्याला शब्द देतो. मी माझ्या मतदार संघात कोणत्याही लग्न कार्याला हजेरी न लावता विकास कामांना प्राधान्य देवुन जनतेची कामे केली व गोरगरीबांसाठी महाराष्ट्रात सर्वांत जास्त योजना राबविल्या म्हणून मतदारसंघातील सर्वसामान्य लोक आमच्या बाजूने आहेत.

माझ्याकडे कोणतेही ह़ॉस्पीटलचे काम घेवुन या गरजुवंतांसाठी स्व:तची यंत्रणा उभी केली आहे.
यावेळी स्नेह सम्मेलनाचे अवचित साधून विद्यार्थी-विद्यार्थीनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
चौकट-
माझ्या मतदार संघात 220 गावे असुनही इतकी मोठी गावांची संख्या असतानाही प्रत्येक गावात मी प्रचंड विकास केलेला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button