Letest News
राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश...
Blog

नवीन दर्शन रांग होऊनही अचानक रविवारी गर्दी वाढल्याने दर्शन रांगेचेही कोलमडले नियोजन!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथे नाताळ तसेच सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या, दत्तजयंती यामुळे रविवारी साई भक्तांची मोठी गर्दी झाली होती . काही कोटी रुपये खर्च करून नवीन दर्शन रांग रंग संस्थांनने केली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते तिचे उद्घाटन झाले. त्यामुळे साई भक्तांना आता गर्दी काळात तरी व्यवस्थित दर्शन रांगेतून दर्शन मिळेल अशी आशा होती. मात्र आज गर्दीमुळे ही साई भक्तांची अपेक्षा फोल ठरली गेली. साई भक्तांना नवीन दर्शन रांगेच्या बाहेरही उन्हामध्ये गर्दीमुळे काही तास उभे राहावे लागले .त्यामुळे साई भक्तांकडून थोडीशी नाराजी ही व्यक्त होताना दिसत होती.

sai nirman
जाहिरात


शिर्डी आज सुट्ट्यांमुळे रविवारी साई भक्तांची मोठी गर्दी झाली. नगर मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात साई भक्तांची वाहने होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी ती रिंग रोडने वळवली. नवीन दर्शन रांग ही सोयी सुविधा युक्त अशी आहे. मात्र आज रविवारी इतकी गर्दी झाली की दर्शन रांग ही भरली होती. मात्र दर्शन रांगेमध्ये तळमजल्यावर काही हाल पेसेज रिकामे ठेवण्यात आले, तेथे भक्तांना बसण्याची ,सावलीची सर्व सुविधा असताना दर्शन रांगेच्या बाहेर भक्तांना काही वेळ उभे करण्यात आले होते. अशी भक्तांकडून चर्चा आहे. साई संस्थानने यापुढे गर्दीच्या काळात नवीन दर्शन रांगेमध्ये जे जे हॉल आहेत. मोकळे पॅसेज आहेत.

DN SPORTS

ते संपूर्ण भक्तांसाठी खुले करावेत. अशी मागणी साई भक्तांकडून यावेळी होत होती. दर्शन रांगेत मोकळे पॅसेज आहेत. येथेही सर्व सुविधा आहेत.मग तेथेही साई भक्तांना गर्दी काळात तरी निदान बसण्यासाठी तरी व्यवस्था केली जावी . कारण वृद्ध, लहान मुले महिला यांना गर्दीमुळे बाहेर उन्हामुळे थंडीमुळे त्रास होतो.अशी मागणी होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button