Letest News
शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली साईदर्शनासाठी आले अन् चोरटय़ाने कारच फोडली-आयटी इंजिनिअरचा लाखोंचा ऐवज लंपास शिर्डीत कारफोडीची दहशत-स... शिर्डीत किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट-भररस्त्यात तरुणाच्या पोटात चाकू खुपसून जीव घेण्याचा प्रयत्न वारंवार तेच आरोपी-तरीही धंदा सुरूच? कल्याणनंतर शिर्डीची पाळी? अवैध देहव्यापाराच्या रॅकेटवर कठोर कारव... रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र निवड समितीवर डॉ. सुरेश हावरे यांची नियुक्ती शिर्डीत शस्त्रतस्करांना पोलिसांचा दणका-स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ-भंडारदरा ४३ टक्क्यांवर निळवंडेतही समाधानकारक पाणीसाठा
राजकीयशिर्डी

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिर्डी साईमय-फुलांची सजावट व विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला

शिर्डी (साई दर्शन न्यूज) – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री क्षेत्र शिर्डी येथे साईभक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असून, संपूर्ण परिसर भक्तिभावाने फुलून गेला आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून आलेल्या भाविकांमुळे शिर्डीत उत्साहाचे आणि श्रद्धेचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
शिर्डी महोत्सवाच्या निमित्ताने दानशूर साईभक्त श्री. बी. ए. बसवराज (बेंगळूरू) यांच्या उदार देणगीतून श्री साईबाबा मंदिर व संपूर्ण परिसरात अत्यंत आकर्षक, मनोवेधक व सुगंधी फुलांची सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी साकारलेली सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
तसेच दानशूर साईभक्त श्री. निलेश सुरेश नरोडे (मे. ओम साई इलेक्ट्रिकल्स अ‍ॅण्ड डेकोरेटर्स, शिंगवे, शिर्डी) यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात भव्य आणि सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईमुळे रात्रौच्या वेळी संपूर्ण साईमंदिर परिसर अधिकच दिव्य व अलौकिक भासू लागला आहे.
नवीन वर्षाच्या प्रारंभी श्री साईबाबांच्या दर्शनाने भक्तांच्या मनात आनंद, समाधान व सकारात्मकतेची भावना निर्माण झाली असून, शिर्डी नगरी पुन्हा एकदा साईनामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button