Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
क्राईमशिर्डी

शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्या अन् बचत गटाचे हप्ते

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या पावन भूमीत साईभक्त आणि स्थानिक महिलांच्या सुरक्षेलाच आव्हान देत ‘धूमस्टाईल’ने दुचाकीवरून येऊन सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या अखेर शिर्डी पोलिसांनी आवळल्या आहेत. गर्दीचा फायदा घ्यायचा, आधी दुचाकी पळवायची, त्याच चोरीच्या वाहनावरून महिलांची रेकी करायची आणि संधी मिळताच गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून धूम ठोकायची, असा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे.
विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी साधेसुधे चोरटे नसून एकावर ९ तर दुसऱ्यावर तब्बल २० गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. म्हणजेच दोघांच्या गुन्हेगारी कारकिर्दीवर तब्बल २९ गुन्ह्यांचा डोंगर उभा आहे. नाशिक जिल्ह्यातील या दोन सराईत मित्रांनी शिर्डी शहराला आपले ‘टार्गेट’ बनवून साईभक्त आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून साडेचार तोळे सोन्याची लगड, दोन दुचाकी असा एकूण ७ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‘पहिले वाहन चोरायचे… मग सुरू व्हायची शिकार!’
या आरोपींची चोरी करण्याची पद्धत पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर त्यांच्या गुन्हेगारी कारवायांचा धक्कादायक चेहरा उघड झाला.
नाशिक जिल्ह्यातून सकाळी शिर्डीत दाखल व्हायचे. गर्दीची ठिकाणे, मंदिर परिसर, पार्किंग परिसर आदी ठिकाणी संधी साधून पहिली दुचाकी चोरी करायची. चोरीच्या वाहनावरून शहरात फिरत एकट्या महिलांची किंवा सोन्याचे दागिने घातलेल्या महिलांची रेकी करायची. योग्य संधी मिळताच दुचाकी वेगाने महिलेच्या जवळ न्यायची आणि क्षणार्धात गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार व्हायचे.
चोरी झाल्यानंतर काही वेळातच परिसर सोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पोलिसांसमोरही आरोपींना शोधण्याचे आव्हान होते.
चोरीच्या सोन्याचा ‘हिशोब’ही धक्कादायक!
पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चोरीचे सोने विकून मिळालेल्या पैशांचा वापर दारूच्या पार्ट्या करण्यासाठी तसेच घरातील बचत गटाचे हप्ते भरण्यासाठी केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.


म्हणजे एका बाजूला महिलांच्या गळ्यातील कष्टाने कमावलेल्या पैशातून घेतलेले दागिने क्षणार्धात लंपास करायचे आणि दुसऱ्या बाजूला त्या चोरीतून मिळालेल्या पैशांचा स्वतःच्या खर्चासाठी वापर करायचा, अशी आरोपींची कार्यपद्धती असल्याचे तपासात पुढे आले आहे.
२९ गुन्ह्यांची ‘गुन्हेगारी कुंडली’; तरीही धाडस कायम!
दोन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांनी तपासली असता एका आरोपीवर ९ आणि दुसऱ्यावर २० गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यामुळे दोघांवर मिळून तब्बल २९ गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
इतकी मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही दोघांनी शिर्डीसारख्या गर्दीच्या आणि देशभरातून साईभक्त येणाऱ्या शहरात पुन्हा चोरीचे सत्र सुरू केल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे.


७ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती
शिर्डी पोलिसांनी केलेल्या कारवाईत—
साडेचार तोळे सोन्याची लगड — अंदाजे ६ लाख ७५ हजार रुपये
दोन दुचाकी
एकूण जप्त मुद्देमाल — ७ लाख ३३ हजार रुपये
असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.


टोळीचा विस्तार किती? ‘मास्टरमाईंड’ कोण? पोलिसांचा तपास सुरू
दोन्ही आरोपींना अटक झाल्यानंतर आता पोलिसांनी तपासाची दिशा आणखी विस्तारित केली आहे. या दोघांसोबत आणखी कोण साथीदार होते का? चोरीचे सोने नेमके कोणाकडे विकले जात होते? सोन्याची लगड कोणी तयार करून दिली? चोरीच्या वाहनांचा वापर करण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणी मदत केली का? या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
आरोपींच्या मोबाईल फोनचा सीडीआर आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.
त्यामुळे या कारवाईतून केवळ दोन चोरटे पकडले गेले आहेत की त्यांच्या मागे आणखी मोठे जाळे आहे, याचा उलगडा पुढील तपासात होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button