Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरराजकीय

अपघाती मृत्यू झालेल्या दोन ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांचे आर्थिक सहाय्य

अहमदनगर दि.१२- ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, तसेच कामगार कल्याण विभागांतर्गत विमा योजनेत त्यांचा समावेश करण्याबाबत माहिती घ्यावी,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या संदर्भात आयोजित बैठकीत दिले. अपघाती मृत्यू झालेल्या दोन ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

kamlakar
        बैठकीस मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे आदी उपस्थित होते.









        अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. आतापर्यंत १० ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५  लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे









         आज झालेल्या बैठकीत शेतात औषध फवारणी करताना विषारी औषध पोटात गेल्याने मरण पावलेल्या  मंदा कराड आणि मोटारसायकल वरून पडून मृत्युमुखी पडलेल्या मोतीलाल राठोड या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यास मान्यता देण्यात आली. 







 एक प्रकरण मान्यतेसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला, तर इतर चार प्रकरणे नैसर्गिक मृत्यू असल्याने नामंजूर करण्यात आली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button