Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरक्राईम

लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️

लोणी : गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात लोणी पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत श्रीरामपूर येथील डॉक्टर राज अजीज शेख याला अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच दोन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांच्या नातेवाईकांसह १२ आरोपींना अटक करण्यात आली होती. आता या रॅकेटचा आणखी एक महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.
तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली की, बेकायदेशीर गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा पुरवठा श्रीरामपूर येथील डॉक्टर राज अजीज शेख करत होता. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूरच्या विशेष पथकाने आज पहाटे कारवाई करत वार्ड नंबर २ येथून डॉक्टर शेख याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान डॉक्टर शेख याने गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता १३ वर पोहोचली असून पोलिसांनी तपासाची व्याप्ती आणखी वाढवली आहे. गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात आलेली बेकायदेशीर मशीन कोठून खरेदी करण्यात आली, त्यासाठी कोणते एजंट कार्यरत होते, याचीही महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली आहे. संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, बेकायदेशीर गर्भपात केंद्रे आणि एजंटांच्या साखळीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.लोणीतील गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक धागेदोरे समोर येत आहेत. नागरिकांमधून आता संतापाची लाट उसळली असून “मोठे मासे अजून मोकाट का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.


╠════════════════════════════════════╣
राहता शहर, साकुरी येथील गोदावरी वसाहत तसेच सावळीविहीर परिसरापर्यंत या रॅकेटची साखळी पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे. अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर, एजंट आणि संशयित मेडिकल नेटवर्क सक्रिय असल्याचा आरोप होत असून पोलिसांनी आता या संपूर्ण जाळ्याचा पर्दाफाश करावा, अशी मागणी होत आहे.
╠════════════════════════════════════╣
विशेष म्हणजे आतापर्यंत १३ आरोपींना अटक झाली असली तरी “मुख्य सूत्रधार अजूनही पडद्यामागे आहेत का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही कथित डॉक्टरांवर यापूर्वीही संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
╠════════════════════════════════════╣
“गर्भलिंग चाचणीसारख्या अमानुष प्रकारात सहभागी असणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये. राहता, साकुरी, सावळीविहीर परिसरातील संशयित बोगस डॉक्टर, एजंट आणि त्यांच्या आर्थिक साखळीची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button