Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
अ.नगरक्राईम

“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा

शोक खरात प्रकरणात SITचा मोठा खुलासा!
महिला अत्याचाराचे ८ गंभीर गुन्हे; १३ हजारांहून अधिक अश्लील लिंक्स हटवल्या
नाशिक : अशोक खरात विरोधातील गाजत असलेल्या गुन्ह्यांच्या तपासात विशेष तपास पथकाने (SIT) मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार २० मार्च २०२६ पासून SIT मार्फत एकूण ११ गुन्ह्यांचा तपास सुरू असून त्यापैकी तब्बल ८ गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे या तपासासाठी तब्बल २४ अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक कार्यरत असून दोन पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा पोलीस उपनिरीक्षक आणि सहा पोलीस अंमलदार तपासात गुंतले आहेत.
SIT च्या माहितीनुसार अशोक खरात विरोधात नाशिक आणि नगर जिल्ह्यात एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ९ गुन्ह्यांचा तपास SIT करत असून उर्वरित गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर, नाशिक शहर व नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

लैंगिक अत्याचारासोबतच फसवणूक, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, सावकारी अधिनियम अशा विविध गंभीर कलमांचा समावेश आहे.
तपासादरम्यान १०५ पेक्षा अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून आरोपी अशोक खरात हा लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. खडे, चिंचुके, रुद्राक्ष, पूजा-विधी यांच्या माध्यमातून भीती निर्माण करून पैसे उकळणे, स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा बनाव करणे, कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवणे आणि महिलांना बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण करणे, असे गंभीर आरोप तपासात समोर आले आहेत.
ईशानेश्वर मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत हातचलाखीने “दैवी शक्ती” असल्याचे भासवून समाजात अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचेही SIT च्या तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात मौखिक, भौतिक, दस्तऐवजी, परिस्थितीजन्य आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे महत्त्वाचे पुरावे SIT च्या हाती लागले आहेत.


दरम्यान, पीडित महिलांचे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्यासाठी SIT च्या सायबर टीमने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र सायबरच्या मदतीने तब्बल १३ हजार १७५ लिंक हटवण्यात आल्या असून ४५१ सोशल मीडिया अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. याप्रकरणी स्वतंत्र दोन गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
अशोक खरात हा विविध गुन्ह्यांमध्ये तब्बल ४९ दिवस SIT च्या कोठडीत होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून इतर गुन्ह्यांमध्येही अटकेत आहे. दोन गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित गुन्ह्यांमध्येही पुढील काही दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी दिली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button