Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला

शिर्डी प्रतिनिधी/ अज्ञात गुन्हेगाराने अंदाजे ५ ते ६ वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंडाळून चासनळी गोदावरी नदीत फेकल्याची घटना शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रामध्ये दुपारच्या सुमारासं नदीकाठी गेलेल्या काही स्थानिकांना संशयास्पद वस्त्र नदीमध्ये तरंगताना आढळले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

जवळ जाऊन पाहिल्यानंतर पांढऱ्या कापडात गुंडाळलेला मृतदेह असल्याचे समजले. घाबरलेल्या नागरिकांनी तालुका पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे प्राथमिक तपासात मृत मुलाच्या शरीरावर जखमा सदृश्य निशाण असल्याचे आढळले आहे त्यामुळे सदर बालकाची हत्या कोणी केली? कशासाठी केली?

नरबळीचा प्रकार तर नसेल ना? असे तर्क वितर्क प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, ज्यातून पुढील तथ्ये उघड होण्याची शक्यता आहे.घटनेची गांभीर्याने दखल घेत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी भेट देत तपासाचे चक्र वेगाने फिरवले आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, मृताच्या कुटुंबीय व स्थानिक नागरिकांची चौकशी केली जात आहे.ही घटना समजल्यावर परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

या घटनेने पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षिततेबाबत समाजाला अंतर्मुख केले आहे. पालकांनी आपली मुले सुरक्षित असल्याची खात्री करावी, तसेच मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button