Letest News
मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह...

जिल्ह्यातील गुंड्यांचे सरदार विखे पितापुत्र विखे नावाचा विंचू जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना डसला

राहाता प्रतिनिधी
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात बोलल्याने त्यांनी त्यांच्या पळलेल्या गुंडांकडून माझ्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात माझ्या जीवितास काही धोका झाल्यास याला सर्वस्वी राधाकृष्ण विखे आणि त्यांचा मुलगा सुजय विखे यांनाच जबाबदार धरण्यात यावे, असे लेखी निवेदन शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून विधानसभा निवडणुकी आधी भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे स्पष्ट होत आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे यांच्या विरोधात बोलल्याने आणि शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीर केल्यानंतर मंत्री विखेंनी अधिकाऱ्यांना सांगून माझे पोलीस संरक्षण काढून घेतले, असा आरोप पिपाडा यांनी केला. पोलीस संरक्षण पुन्हा मिळण्याबाबत पिपाडा यांनी 14 ऑगस्टला पत्रही दिल्याचे ते म्हणाले.विखेंनी माझ्यावर हल्ला कारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 16 ऑगस्ट रोजी विखेंच्या लोणी जवळील चंद्रापूर गावात एकादशीच्या दिवशी माझ्या कुटुंबीयांच्या वतिने महाप्रसादाची पंगत होती. याला माझी पत्नी व कुटुंबीयांसह उपस्थित राहिलो. किर्तन सुरू असताना विखेंनी त्यांचे पाळीव गुंड यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले. मात्र ग्रामस्थ व इतरांनी मध्यस्थी केल्याने मी वाचलो. विखे पिता-पुत्र इतक्या खालच्या पातळीवर राजकारण करत आहेत, असा आरोपही पिपाडा यांनी केला.शिर्डी मतदारसंघात विखेंच्या चार-चार पिढ्यांनी

राज्य केले, तरी विकासाचा कुठलाही मागमूस नाही.

बेरोजगारांच्या फौजा वाढत असून तरुणांच्या

हाताला काम नाही. सोसायटी त्यांच्याकडे,

ग्रामपंचायत त्यांच्याकडे, जिल्हा बँक यांच्याकडे, दूध

सोसायटी यांच्याकडे, साखर कारखाने, बाजार

समिती, मंत्रीपदं आणि खासदारकीही यांच्याकडे.

सत्तेचा वापर करून लोकांना धमकवायचे, जनतेला

गुलाम बनवायचे, विरोधकांच्या सभेला गेल्यास

त्याला ऊस उचलायचा नाही, बँकेकडून कर्ज मिळून

द्यायचे नाही हा प्रकार सगळ्यांनी पाहिला आहे, असा

आरोपही पिपाडा यांनी केला.

माझ्या विरोधात खोटे खटले दाखल करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पण विखेंच्या झुंडशाही आणि गुंडगिरी विरोधात मी लढा सुरुच ठेवेल. सत्तेची दहशत मोडून काढली पाहिजे. विखेंनी मला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असेही राजेंद्र पिपाडा पुढे म्हणाले.

जाहिरात
sai ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button