Letest News
मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह...
Blog

शिर्डीत साईभक्तांची लूट करणाऱ्या टोळी पकडण्यात पोलिसांना अपयश साईभक्त भाविकांत नाराजी तात्काळ कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक नेमण्याची गरज

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीत दररोज साईभक यांची पाकीटमारी, चैन सनेकिंग,गाड्या फोडून चोऱ्या करणे तसेच दिवसातून निदान एक ते दोन मोटार सायकल चोऱ्या करणे हे राजरोसपणे घडत आहे
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील साईभक्त मोहित तिवारी २६ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी स्विफ्ट क्रमांक डीएल सी ए एन ३४३३ या वाहनातून सहकुटुंब आले होते रात्री आठ वाजेच्या सुमारास हॉटेल साई शताब्दी येथे रूम घेतली व गाडी पार्किंग केली सकाळी सात वाजेच्या सुमारास साईदर्शनानंतर परत आले असता गाडीच्या ड्रायव्हर बाजूची काच त्यांना फोडलेली दिसली गाडीची तपासणी केली असता गाडीतील चार हजार रुपये किमतीची स्टेपणी v पंधराशे रुपये किमतीचा जॅक टूल्स आदी वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने तिवारी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादवी ३७९,४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे
शिर्डी शहरात ह्या अगोदरही चार चाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर चोऱ्या झालेल्या असून अशा चोरट्यांना पकडण्यात स्थानिक शिर्डी पोलीस व गुन्हे अन्वेषण विभाग व पोलिस अधिक्षक यांना अद्यापही यश आलेले नाही अवैध व्यवसायाची बारीक सारीक माहिती असलेल्या या पथकाला हि टोळी जेरबंद करण्यात यश आले नाही या गंभीर प्रश्नात पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज आहे या अगोदरही देखील तात्कालीन जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेऊन शिर्डी येथील अवैध व्यवसाय व गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोरपणे कारवाई करा असे आदेश विखे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस याना शिर्डी बैठकीत देखील दिले होते मात्र याकडे होणारे दुर्लक्ष पाहता पोलीस प्रशासन मंत्र्यांच्या आदेशाकडे देखील केराची टोपली दाखवताना दिसत आहे मात्र अशा प्रकारे चोरी करणारे गुन्हेगार सापडत नसल्यामुळे साईभक्त व ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून या गंभीर प्रकरणात नवीन आलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे चार चाकी वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारे ह्या टोळीची मोडस पाहता, ही टोळी सराईत असून या अगोदर काही गुन्ह्यात चोरटे सी सी टीव्हीत देखील कैद झाले होते मात्र स्थानिक पोलीस व जिल्ह्यातील पथकाला देखील हे चोरटे पकडण्यात अपयश आलेले आहे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलिस दल कार्यरत आहे मात्र नुकतीच वकील दाम्पत्याची झालेली हत्या,शिर्डीत राजरोस होणाऱ्या चोऱ्या पाहता जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आपल्या पोलिस दलावर वचक आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्वतः आता जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि चोऱ्या,खून याकडे लक्ष देणे गरजेचे बनले असून अहमदनगर जिल्ह्याचा बिहार होऊ नये याबाबत पोलिस प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे बनले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button