Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
शिर्डी

आमचे दादा गेले… निशब्द” — महिंद्रा शेळके पाटील यांची आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

आदरणीय अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र राज्याचे प्रचंड नुकसान झाले असून, कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महिंद्रा शेळके पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“आमचे दादा गेले… निशब्द,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, अजितदादा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. शिस्त, कामाचा ध्यास आणि वेळेची किंमत याचे महत्त्व आम्ही दादांकडूनच शिकलो, असे त्यांनी नमूद केले.


अजितदादा हे केवळ एक प्रशासक किंवा राजकीय नेते नव्हते, तर आपल्या कार्यपद्धतीतून सातत्याने प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कामातील शिस्त, स्पष्टता आणि निर्णयक्षमता ही सर्वांसाठी आदर्शवत होती. आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासह नेहमीच त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत आलो आहोत, असेही महिंद्रा शेळके पाटील यांनी सांगितले.


“दादा, तुमची कार्यपद्धती, तुमची शिस्त आणि तुमची प्रेरणा आमच्या कुटुंबाच्या विचारांमध्ये कायम जिवंत राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या श्रद्धांजलीत भावना व्यक्त केल्या.
शेवटी त्यांनी “भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 ॐ शांती 🕊️” असे म्हणत आदरणीय अजितदादांना अखेरचा निरोप दिला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button