Letest News
वाळू वाहतुकीला अभय देण्यासाठी पोलिसाचा दरमहा हप्त्याचा धंदा! ५० हजारांची मागणी ४० हजारांची लाच स्वीक... खाकी वर्दीला डाग? पोलीस कर्मचाऱ्याला पैसे घेताना पकडल्याची माहिती! डोक्यावर संविधान… न्यायासाठी शिर्डी ते मुंबई पायी दिंडी! साई संस्थानच्या १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्य... मायेची सावली हरपली! आदर्श माता वत्सलाबाई गडकरी काळाच्या पडद्याआड साईभक्तीचा अनोखा सेवाभाव! पुण्यातील चौगुले कुटुंबीयांकडून साईसंस्थानला १२ लाख ८४ हजारांची भरघोस देणग... मंदिर व्यवस्थापन आता केवळ परंपरेपुरते नाही-आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचीही गरज – गोरक्ष गाडीलकर मुख्यमंत्र्यांचा जीआर निघाला-मग शिर्डी मतदारसंघातील गोरगरीबांना सातबारा कधी मिळणार? डॉ. राजेंद्र पिप... शेजाऱ्याच्या कुंपणाचा दाखला देणाऱ्या सुजय विखेंनी जनतेच्या प्रश्नांच्या कुंपणात अडकू नये टीकेला उत्त... १५ वर्षांच्या शोषणाचा गंभीर आरोप-माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यावर बलात्काराचा गुन्... शिवसेनेच्या पदाधिकारी निवडीसाठी २३ व २४ नोव्हेंबरला मुलाखती जिल्हा प्रमुख कमलाकर कोते
क्राईमशिर्डी

वाळू वाहतुकीला अभय देण्यासाठी पोलिसाचा दरमहा हप्त्याचा धंदा! ५० हजारांची मागणी ४० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात!

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच खाकी वर्दीतील कर्मचाऱ्याने वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा हप्त्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून समोर आला आहे. तब्बल ५० हजार रुपये दरमहा हप्ता मागितल्याच्या तक्रारीनंतर ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईने शिर्डी पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटनुसार, तक्रारदार हे ३२ वर्षीय असून त्यांचा गौण खनिज वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांना आठ दिवसांपूर्वी वाळू डिलिव्हरीची ऑर्डर मिळाली होती. वाळू वाहतूक सुरू असताना आरोपी पोलीस हवालदाराने त्यांचे हायवा वाहन अडवून कारवाई न करण्यासाठी तसेच वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा ५० हजार रुपये हप्त्याची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.

DN SPORTS

kamlakar

या तक्रारीची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पडताळणी केली. त्यावेळी आरोपीने तडजोडीअंती दरमहा ४० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.

त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान सिन्नर-शिर्डी रोडवरील ढेड फाटा परिसरात पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार अशोक रामा शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

आरोपी अशोक रामा शिंदे (वय ४६, पोलीस हवालदार, बक्कल क्रमांक ७९२) हे शिर्डी शहर वाहतूक शाखेशी संबंधित असून सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी येथे संलग्न असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.

या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे.

पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस कर्मचारी विनोद चौधरी, नितीन नेटारे, प्रमोद पाळंदे व चासपोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

खाकी वर्दीचा धाक की हप्तेखोरीचे साधन?

वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असताना त्याच वाहतुकीला अभय देण्याच्या मोबदल्यात दरमहा पैशांची मागणी होत असल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कारवाईमुळे संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाळू वाहतुकीच्या नावाखाली आणखी कुणाकडून अशाच प्रकारे हप्ते मागितले जात होते का? या प्रकरणामागे आणखी कोणाचे हितसंबंध आहेत का? याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

दैनिक साईदर्शनचा सवाल : कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच कायद्याच्या नावाखाली हप्ते मागितल्याचे प्रकार समोर येत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कुणाकडे? या प्रकरणाची केवळ एका कर्मचाऱ्याच्या अटकेपुरती चौकशी न थांबता संपूर्ण व्यवहाराची पाळेमुळे शोधली जाणार का?

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button