शिर्डी | प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. महेश चंद्र त्रिपाठी यांनी सहपरीवार श्री साईक्षेत्र शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी आशीर्वाद मागितला.

यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिवाजी कचरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. महेश चंद्र त्रिपाठी यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्यासह संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.
श्री साईबाबांच्या पावन भूमीत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या आगमनामुळे शिर्डीतील आध्यात्मिक आणि न्यायक्षेत्रातील या विशेष भेटीला महत्त्व प्राप्त झाले.