Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरक्राईम

घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच-ग्रामविकास अधिकारीसह तिघांवर एसीबीचा सापळा

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या अनुदानाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत लिपिक (कंत्राटी) आणि गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) अशा तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राहुरी पोलीस ठाण्यात सुरू आहे.

sai nirman
जाहिरात

या प्रकरणातील आरोपींमध्ये हैदर याकुब पटेल (वय ५६), ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सात्रळ, ज्ञानदेव मोहन डुकरे (वय ४३), कंत्राटी लिपिक, ग्रामपंचायत सात्रळ आणि सचिन हौशीराम ब्राम्हणे, कंत्राटी गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती राहुरी यांचा समावेश आहे.

DN SPORTS

kamlakar

तक्रारदार यांना सन २०२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. त्यांना पहिला १५ हजार रुपयांचा व दुसरा ७० हजार रुपयांचा हप्ता प्राप्त झाला होता. पुढील हप्ते मंजूर करून देण्यासाठी तसेच यापूर्वीच्या हप्त्यांच्या प्रक्रियेत मदत केल्याच्या मोबदल्यात आरोपींनी २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २९ जून २०२६ रोजी एसीबीकडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी ३० जून रोजी करण्यात आली. पडताळणीत ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल आणि लिपिक ज्ञानदेव डुकरे यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला.

सापळा कारवाईदरम्यान आरोपी ज्ञानदेव डुकरे यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. तसेच गृहनिर्माण अभियंता सचिन ब्राम्हणे यांनी ही लाच स्वीकारण्यासाठी डुकरे यांना प्रोत्साहन दिल्याचेही तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी कारवाईचे पर्यवेक्षण केले. पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्यासह एसीबीच्या पथकाने सापळा यशस्वी केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास तात्काळ एसीबीकडे तक्रार नोंदवावी.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button