

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी शहरात व परिसरात पिढी चालक चावला नावाचा इसम अवैध मटका व्यवसाय करण्याकरता जागोजागी एजंट नेमून अवैध व्यवसाय करत आहे.तरी त्यांच्यावर कारवाई करावी.अशी मागणी दिंगबर हरिभाऊ कोते यांनी पोलीस उप विभागीय अधिकारी यांचकडे केली आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
शिर्डी शहरांमध्ये तसेच शिर्डी परिसरामध्ये अवैध मटका पिढी चालक चावला नावाचा इसम याने शिर्डी शहरात अनेक एजंट मोबाईलवर अवैध मटका व्यवसाय करण्यासाठी बसविले आहेत असे मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून फोनवर समजले .
सदर इसमावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत असे प्रथमदर्शनी समजले.
शिर्डी मंध्ये अवैध धंदे बंद असताना सदर इसम त्याचे पंटर शिर्डी व शिर्डी परिसरात जागोजागी मटका घेणारे एजंट बसवून सदर अवैध मटका व्यवसाय घेताना प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तरी संबंधित इसमावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी.
अन्यथा मला या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशन व संबंधित इतर पोलीस स्टेशन यांचे समोर उपोषणास बसावे लागेल .असा ईशारा त्यांनी या पत्रात दिला आहे .हे पत्र जिल्हाधिकारी साहेब ,
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब नाशिक.
मा. पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर
मा. अपर पोलीस अधीक्षक साहेब श्रीरामपूर.आदींना पाठवण्यात आले आहे.