Letest News
शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड
Blog

आपला संकल्प विकसित भारत रथयात्रा सध्या तालुक्यातील ठिकाणी जात असून ही संकल्प रथयात्रा राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथेआली असता या संकल्प यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

सावळीविहीर बुद्रुक येथे आल्यानंतर सावळीविहीर बुद्रुक येथील सरपंच ओमेश साहेबराव जपे व उपसरपंच विकास जपे , ग्रामविकास अधिकारी कार्ले व पदाधिकारी , कामगार तलाठी शिलावंत मॅडम ‌यांनी स्वागत केले, या संकल्प रथयात्रे चे स्वागत करण्यासाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच न्यू.इं. स्कूल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी झांज पथक ,लेझीम नृत्य सादर केले. तसेच ग्रामपंचायतीसमोर संकल्प रथयात्रा गेल्यानंतर तेथे विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या अनेक विकास कामांचे तसेच विविध योजनांचे माहिती असणारे कॅलेंडर उपस्थितांना वाटण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक लाभार्थींनी यावेळी भाषणे करत घरकुल योजना, बचत गटाला मिळणारे फायदे ,दवाखान्यात मिळणाऱ्या सुविधा ,याचा लाभ मिळाल्याबद्दल मोदी सरकारचे धन्यवाद मानले. यावेळी दत्ता गायकवाड सर यांनी या संकल्पनेचा उद्देश यावेळी उपस्थितांना सांगितला. व सर्वांना भारत देशाच्या विकास संकल्पनेची शपथ दिली.सरपंच ओमेश जपे यांनी यावेळी सावळविहीर बुद्रुक गावाच्या वतीने या संकल्प रथ यात्रेला शुभेच्छा दिल्या.
या संकल्प रथ यात्रेसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी ,हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,आशा सेविका ,महिला बचत गटाच्या महिला अनेक लाभार्थी, विद्यार्थी , नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button