Letest News
साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा... सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!१९ वर्षांच्या न्यायसंघर्षाला नवी दिशा तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी!
Blog

श्री साई संस्थांनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विनाकारण खाजगी कामासाठी आपले कामाचे ठिकाण कामाच्या वेळेत सोडू नये!

शिर्डी ( प्रतिनिधी) श्री साईबाबा संस्थान मधील अधिकारी व‌ कर्मचारी यांनी आपल्या कामाच्या वेळेत आपल्याला नेमून दिलेल्या कामाची जागा सोडून बाहेर कोणत्याही खासगी कामासाठी जाऊ नये जर काही संस्थांचे महत्त्वाचे काम असेल अशा गरजेच्या जातेवेळी गेटपास घेऊनच बाहेर जावे व तशी जाताना येताना आपल्या विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा व नोंद करावी. असे परिपत्रक श्री साई बाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर यांनी संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी काढले आहे. त्यामुळे विनाकारण खाजगी कामासाठी आपले कामाचे ठिकाण सोडून फिरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठी वचक त्यामुळे निर्माण झाली आहे.
श्री साईबाबा संस्थान
जा.नं. एसएसएस/साप्रशा/आस्था/६१३/२०२३ दि. १४ जुन २०२३ रोजीचा आदेशानुसार
परिपत्रक काढले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


या परिपत्रकात म्हटले आहे की,श्री साईबाबा संस्थान शिर्डी अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना काही खाजगी व आकस्मिक प्रसंगी विहीत
वेळेपूर्वी कार्यालय सोडावे लागल्यास त्याची नोंद हालचाल रजिस्टरमध्ये करुन, पूर्व परवानगीने कार्यालय
सोडणेबाबत तसेच अशा प्रकारची सवलत महिन्यातुन एकापेक्षा जास्त वेळ घेता येणार नाही असे आदेशीत करणेत
आलेले आहे.
तथापी, असे निदर्शनास येते की, वरिल निर्देशाचे पालन न करता, संस्थानचे कायम / कंत्राटी / मानधनावरील /
आऊटसोर्स कर्मचारी हे वैयक्तीक कामासाठी कामाची जागा सोडून बाहेर जातात. सदर बाब कार्यालयीन शिस्तीस धरुन्
नाही. सबब पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी,
वरील उपस्थितीत कर्मचा-यांना त्या त्या विभागातील अधिक्षक / विभाग प्रमुख यांनी गेटपास देणेत यावेत. सदर
गेटपास सुरक्षा रक्षकानी गेटवर जमा करून घेऊन त्यावर अधिकारी व कर्मचारी यांची बाहेर जाण्याची व परत आल्याची वेळ
नमूद करावी. सुरक्षा
रक्षकाने देखील त्यावर आपली स्वाक्षरी व नाव नमूद करुन सदरचे गेटपास संरक्षण विभागात जमाकरावेत. संरक्षण विभागाने सदर गेटपासची दरमहा पडताळणी करून, अधिकारी / कर्मचा-याचे नाव, बाहेर गेल्याचा दिनांक,वेळ परत आल्याची वेळ यानुसार विभागवार अहवाल तयार करुन सदर अहवाल रजा विभाग, प्रशासन शाखेकडे सादर
करावा. रजा विभागाने सर्व अहवाल तपासून खाडे तक्त्यासोबत पगार बील विभागास सादर करावे,
मासिक वेतनाची / मानधनाची परिगणना करताना दैनंदिन बायोमेट्रीक / फेस रिडींग रिपोर्ट (कामावर आगमन
निर्गमन वेळ) याबरोबरच संरक्षण विभागाकडील अहवालानुसार कर्मचारी यांचे कामाची जागा सोडून गेल्याचे व परत
आल्याच्या वेळही विचारात घेण्यात यावी.
सदर परिपत्रकाची अंमलबजावणी त्वरीत करणेत यावी. असे या परिपत्रकात श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पी. शिवशंकर यांनी म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button