Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह

शिर्डी | प्रतिनिधी :
शिर्डीमध्ये श्रीराम मंदिर उभारण्याच्या प्रस्तावित जागेबाबत विविध स्तरांत चर्चा सुरू असताना, मंदिराची जागा निवडताना भाविकांची सोय, पार्किंग, वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील वाढती भाविकसंख्या या सर्व बाबींचा विचार व्हावा, असे मत शिर्डीचे ज्येष्ठ नागरिक व साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शिर्डीच्या धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने श्रीराम मंदिराची उभारणी ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र, मंदिरासाठी जागा निवडताना ती भाविकांना सहज पोहोचता येईल अशी असावी, तसेच भविष्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाल्यास आवश्यक पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध करून देता याव्यात, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोंदकर पाटील यांनी सांगितले.
साईनगरलगतची जागा अधिक सोयीची ठरू शकते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साईनगरच्या दक्षिणेस आणि मुख्याधिकारी निवासस्थानाच्या पूर्वेकडील परिसरात असलेली मोठी जागा मंदिरासाठी विचारात घेता येऊ शकते, असे त्यांनी सुचविले. सदर जागेचा सध्या मोठ्या प्रमाणावर पार्किंगसाठी उपयोग होत नसल्याने, भविष्यात भाविकांच्या सुविधेसाठी त्या जागेचा नियोजनबद्ध वापर करता येईल, असे त्यांचे मत आहे.
या ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह भव्य श्रीराम व श्रीकृष्ण मंदिर उभारल्यास शिर्डीच्या धार्मिक पर्यटनाला आणखी चालना मिळू शकते. मंदिर परिसरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक नियोजन आणि इतर विकासकामे करण्यासही मोठ्या जागेचा फायदा होऊ शकतो, असे डॉ. गोंदकर पाटील यांनी नमूद केले.


मंदिराची जागा निवडताना भविष्यातील शिर्डीचा विचार व्हावा
शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिराची जागा निवडताना केवळ सध्याची परिस्थिती न पाहता पुढील अनेक वर्षांचा विचार करणे आवश्यक आहे.
मुख्य धार्मिक परिसरापासून काही अंतरावर मंदिर उभारण्यात येणार असल्यास भाविकांना तेथे जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था, पार्किंग आणि इतर सुविधांचे योग्य नियोजन करावे लागेल. त्यामुळे उपलब्ध पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास करून भाविकांच्या दृष्टीने अधिक सोयीची जागा निवडावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.


डॉ. गोंदकर पाटील यांनी कोणावरही थेट आरोप न करता, त्या व्यवहाराशी संबंधित अधिकृत कागदपत्रे, प्रक्रिया आणि निर्णयांची माहिती पारदर्शकपणे जनतेसमोर उपलब्ध करून देणे योग्य ठरेल, असे मत व्यक्त केले.
“. कोणावरही आरोप करण्याचा माझा हेतू नाही. मात्र, सर्व बाबी पारदर्शक असणे हे संस्थान आणि भाविक दोघांच्याही हिताचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थ, नेते आणि संस्थानने एकत्रित चर्चा करावी


श्रीराम मंदिरासारखा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रकल्प उभारताना शिर्डी ग्रामस्थ, सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि श्री साईबाबा संस्थानचे पदाधिकारी यांनी एकत्र बसून चर्चा करावी, अशी अपेक्षा डॉ. गोंदकर पाटील यांनी व्यक्त केली.
“मी एक ज्येष्ठ नागरिक आणि साईभक्त म्हणून माझे प्रांजळ मत मांडत आहे. कोणाच्याही विरोधासाठी किंवा कोणावर टीका करण्यासाठी हे मत नाही. शिर्डीत येणाऱ्या लाखो भाविकांची सोय आणि भविष्यातील शिर्डीचा विकास लक्षात घेऊन सर्वोत्तम निर्णय व्हावा, एवढीच माझी अपेक्षा आहे,” असे त्यांनी सांगितले.


शिर्डीच्या धार्मिक वैभवात श्रीराम व श्रीकृष्ण मंदिराची भर पडली तर त्याचा आध्यात्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने निश्चितच फायदा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी जागेची निवड, पार्किंग, वाहतूक आणि भाविकांच्या सुविधांचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांची मते जाणून घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी प्रांजळ भूमिका डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांनी मांडली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button