Letest News
सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला
राजकीयशिर्डी

सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून

शिर्डी शहरातील धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सन्मित्र युवक मंडळाच्या वतीने यंदाही सालाबादप्रमाणे श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने सुरू असलेली ही परंपरा यंदा ६२व्या वर्षात पदार्पण करीत असून, सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश यागाला सुरुवात होणार आहे.
सन्मित्र चौक, ४ नंबर गेटसमोर शिर्डी येथे गणेश यागाचे आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्ते तसेच गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सन्मित्र युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गणेश यागाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, गणरायाच्या चरणी श्रद्धा आणि भक्तिभावाने सेवा करण्याची संधी भक्तांना मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सन्मित्र युवक मंडळाने जपलेली ही धार्मिक परंपरा यंदाही उत्साहात पार पडणार आहे.
गणेश यागात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी गजानन शेरवेकर अण्णा – ९४२२७९२०३८ यांच्याशी संपर्क साधावा, असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button