Letest News
पत्रकारितेतील माझे मार्गदर्शक — शहा मुस्ताक अली यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟 शिर्डीकरांची मागणी — “विखे यांनी आदर्श उमेदवार द्यावेत!”🔸 “अनुभवी आणि लोकाभिमुख व्यक्तींनाच संधी”🔸 “... शिर्डी नगरपरिषद निवडणूक 2025 — विखे घराण्याच्या रणनीतीबाबत चर्चांना उधाण! ६० टक्के नवीन चेहरे — नागर... प्रभाग क्रमांक २ मध्ये “अमृत गायके” यांच्या नावावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ! शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग ५ मध्ये “नितीनभाऊ शेजवळ” यांच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा! शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग क्रमांक १ मध्ये “संदीप भाऊ सोनवणे” यांच्या नावावर जनतेचा विश्व... प्रभाग क्रमांक २ मधून सौ. शोभाताई राजेंद्र कोते पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा राहात्यात धाडसी चोरी! – पान दुकानाचे शटर फोडून दोन लाखांहून अधिक रक्कम लंपास इंजेक्शनकांड भाग–२ “सावळीविहीर येथील डॉक्टराची जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतली गंभीर दखल ? शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक १ मध्ये संदीप भाऊ सोनवणे यांच्या उमेदवारीची ज...
Blog

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घालून चौघा जणांना हिरावून घेतले. तर सहा जण जखमी झाले. यात आठ महिन्यांची मुलगी आश्चर्यकारकरीत्या बचावली. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास भाविकांची तवेरा गाडी आणि कंटेनरची धडक हा अपघात घडला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्योती दीपक हुनशामठ (३८ रा. कलबुर्गी) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) अशी मृतांची नावे आहेत. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशैल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) आणि तवेरा चालक श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. अपघातानंतर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली पालथी होऊन अक्षरशः चक्काचूर झाली. अपघातानंतर कंटेनर चालकाने पलायन केले.

कर्नाटकतील कलबुर्गी, हुबळी, बागलकोट भागातील एकमेकांचे नातेवाईक असलेले भाविक देवदर्शनासाठी तवेरा गाडीतून प्रवास करीत होते. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर हे भाविक तुळजापुरात मुक्काम करून बार्शी-परांडा-करमाळामार्गे पुढे शिर्डीकडे जाण्यासाठी निघाले होते. करमाळा तालुक्यातील पांडे गावच्या हद्दीत तवेरा व कंटेनर यांची जोरात धडक झाली. अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना करमाळ्यातील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button