शिर्डी
श्री साईबाबांच्या शिर्डीत अयोध्या येथुन आलेल्या श्रीराम कलशाचे संस्थानं व ग्रामस्थांकडून पूजन संपन्न

श्री साईबाबांच्या पुण्यभूमीत आयोध्या तीर्थक्षेत्रावरून आलेल्या श्रीराम मंगल अक्षदा कलशाचा पूजन कार्यक्रम श्री साईबाबा संस्थानचे वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप (16 गुंठे) या ठिकाणी पार पडला. त्यानंतर कलशाचे पूजन करून कलश समाधी मंदिरात साईभक्तांना दर्शनाकरिता ठेवण्यात आला. यावेळी महंत रामगिरी महाराज, सरला बेट, केंद्रीय सहमंत्री विश्व हिंदू परीषद दादाजी वेदक तसेच श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मंदिर विभागप्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, कार सेवक, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात
DN SPORTS