Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरक्राईम

भर चौकात टोळी युद्धातुन गोळीबार कोपरगावात दहशतीचे वातावरण पोलीस अधीक्षक यांचे मात्र गुन्हेगारी कडे दुर्लक्ष

भर चौकात टोळी युद्धातुन गोळीबारकोपरगावात दहशतीचे वातावरण पोलीस अधीक्षक यांचे मात्र गुन्हेगारी कडे दुर्लक्ष

कोपरगाव शहरात पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर नवश्या मारुती मंदिरानजीक गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी भरदिवसा साडेचार वाजता गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात घबराटीचं वातावरण पसरलंय. या गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्विय सहाय्यक यांच्या चौकशीची मागणी भाजपा युवा नेते विवेक कोल्हे यांनी केलीय.

sai nirman
जाहिरात

आमदार काळेंवर गंभीर आरोप : तन्वीर रंगरेज यांच्यावर गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी रंगरेजला उपचारासाठी नेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत तो आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहकारी जोशी यांचं नाव घेत असल्याचं दिसून आलं.

DN SPORTS

त्यामुळं आता या घटनेला आता राजकीय वळण लागलं असून आमदार काळे यांचे राजकीय शत्रू असलेले भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी आज थेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. आमदार काळे यांच्यासह आरोपी नाजीम शेख यांचे काही फोटो व स्टेटस दाखवत आमदार काळेंवर गंभीर आरोप त्यांनी केलाय.

kamlakar

आमदार आशुतोष काळे यांना राजकीय आश्रय असल्यानं अशा आरोपींना पाठबळ देत असल्यानं त्यांची व संबंधितांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली.

पोलिसांनी संबंधित गोळीबार प्रकरणात आठ आरोपींना अटक केली असून हा गोळीबार टोळीयुद्धातून झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, अवैध व्यवसायातून हा प्रकार घडला असल्यानं राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आलीय.

चक्री,बिंगो,बेकायदा रेशन,बाजार ओट्यावरील गांजा ,अवैध शस्त्र कारखाना यावर पोलिसांचे लक्ष वेधले.महिला भगिनी,विद्यार्थी मोठ्या संख्येने असताना गोळीबार झाला तिथे इतर कुणाला इजा झाली असती तर त्याला जबाबदार कोण असते.महापुरुषांचे नाव घेऊन किंवा जातीवाचक शिवीगाळ करून वातावरण दूषित करणारे वाळूतस्कर आमदारांचे कार्यकर्ते आहेत हे समोर येते आहे. दोन वेळा मुस्लिम समाजाच्या पवित्र धर्मग्रंथाची विटंबना,

धर्म कोणताही असो त्या धर्मगुरुला मारहाण होणे, समाजा समाजात तेढ निर्माण करणे ऐन सणासुदीच्या काळात बाजारपेठेला परिणाम करणारे आहे.गोर गरीब समाजाला त्रास देऊन त्यांच्या रोजगारावर याचा परिणाम होतो आहे हे अशा प्रवृत्तींना जोपासनाऱ्या लोकप्रतिनिधीनी लक्षात घ्यावे.होती.खडकी येथे शस्त्र कारखाना कुणाच्या जागेत होता जागा मालक कोणा चे कार्यकर्ते होते त्यांवर काय कारवाई झाली ?

दर्शना पवार या एम पी एस सी उत्तीर्ण युवतीच्या खून प्रकरणात राज्यातील इतर आमदार सभागृहात बोलले पण कोपरगावचे आ.काळे मात्र त्यात मौन राहिले ही शोकांतिका आहे.स्व.कोल्हे साहेब,स्व.काळे साहेब यांच्या काळात असे प्रकार झाले नाही पुढेही गावपण जपले गेले मात्र या पाच वर्षात अक्षरशः आशुतोष काळे यांनी चुकीचे प्रकार वाढीस येऊ देत विद्रुपीकरण केलें आहे असा घनाघात काळे यांचें नाव न घेता विवेकभैय्या कोल्हे यांनी केला आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button