Letest News
लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड
क्राईमशिर्डी

दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी!

शिर्डी हे देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागतिक कीर्तीचे धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. या धार्मिक नगरीत दारूबंदी कायदा लागू असतानाही शहरातील अनेक भागांमध्ये अवैध दारूची राजरोस विक्री सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून वारंवार केले जात आहेत. विशेष म्हणजे, दारूबंदी असताना सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील काही ठिकाणी अवैध दारूविक्री दिवसाढवळ्या सुरू असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत आहे. अवैध दारूच्या अड्ड्यांवरून अनेकदा वाद, भांडणे, मारहाणीच्या घटना घडत असून महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरी, घरफोडी, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, अनेकवेळा संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करूनही अवैध धंद्यांवर अपेक्षित आणि कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने अवैध धंदे चालविणाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे “दारूबंदी कायदा केवळ कागदावरच आहे का?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत.


दरम्यान, परभणी जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत जुगार, मटका, अवैध दारू, गुटखा आणि रेती तस्करीविरोधात धडक कारवाईचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षकही शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्यातील अवैध दारू अड्डे, मटका-जुगार व्यवसाय आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करतील का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button