Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
क्राईमशिर्डी

कालिका नगर येथील एस एस फायबरच्या कारखान्याला लागली आग 

शिर्डीतील कालिकानगर परिसरातील एसएसएस डोअर फायबर या गोडाऊनला आज (19 ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडाऊनमधील लॅमिनेशन पेपर, पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यामुळे जवळपास 40 लाखांच्या नुकसानीची माहिती कारखान्याचे मालक नवनाथ जाधव यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलानं तत्काळ दाखल होऊन आग विझवली. सध्या नुकसानीचं मूल्यांकन सुरू असून, अधिक तपासासाठी स्थानिक अधिकारी घटनास्थळी आहेत.

एसएसएस डोअर फायबर गोडाऊनला आग लागल्याचं समजताच शिर्डी साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायत आणि राहाता नगरपंचायत यांच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तातडीनं केलेल्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि मोठा अनर्थ टळला. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लायवूड आणि साहित्य साठवलेलं असल्यामुळे आग अधिक भडकण्याचा धोका होता,

मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कामगिरीमुळे आगीचा लोन रोखता आला. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या दुर्घटनेमुळे जाधव यांचं मोठं नुकसान झालं आहे हा कारखाना अगदी भरवस्तीत आहे आगीचे लोन जास्त प्रमाणात होते

त्याठिकाणी तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणली म्हणून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि दरवाजे बनवण्याचे लिक्विडचे वास संपूर्ण परिसरात येते त्यामुळे तेथील रहिवासी ह्या वासाने ट्रस्ट झालेले आहेत

भर लोक वस्तीत ह्या दरवाज्यांचे कारखान्यास परवानगी दिली कोणी कि विना परवानगीनेच याठिकाणी हा कारखाना थाटला आहे याची चौकशी होऊन संबंधित मालकावर गुन्हा दाखल होऊन हा कारखाना तेथून हलवावे अशी मागणी कालिका नगर येथील रहिवासी यांनी केली आहे 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button